आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिजाबविरोधी आंदोलकांवर दडपशाही:इराणमध्ये हिजाबविरुद्ध आंदोलन करणाऱ्या पहेलवानाला दिली फाशी

तेहरान3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिजाबविरोधी आंदोलनावरून आणखी एका तरुणाला फाशी दिली. कुस्तीपटू मजीदरेजा रहनवार्डला आंदोलनादरम्यान अटक केली होती. यानंतर 24 नोव्हेंबरला मशहद रिव्होल्यूशनरी कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

वृत्तानुसार, सरकारने आरोपीला कथितरित्या वकीलही दिला नसल्याचे सांगण्यात येते. कैदेत त्याला छळण्यात आले. न्यायालयात हजर केल्यावर त्याला जखमा झाल्याचे दिसले होते.

इराणमधील निषेधाच्या संदर्भात फाशी देण्यात आलेली माजिद्रेझा रहनावर्ड ही दुसरी व्यक्ती आहे.
इराणमधील निषेधाच्या संदर्भात फाशी देण्यात आलेली माजिद्रेझा रहनावर्ड ही दुसरी व्यक्ती आहे.

माजिद्रेझा रहनावर्डच्या फाशीवर नाराजी व्यक्त करताना, इराणी पत्रकार आणि कार्यकर्ते मसीह अलीनेजाद यांनी ट्विट केले की, इराण सरकार जगाचे मत उडवून लावत आहे. मशहाद शहरात आणखी एका निदर्शकाला सार्वजनिकरित्या फाशी देते. रहनवर्डचा गुन्हा केवळ महसा अमिनीच्या हत्येला विरोध करणे हा होता. या सरकारची आंदोलने हाताळण्याची पद्धत फाशी देणे हा आहे. युरोपियन युनियनने आपल्या राजदूतांना परत बोलावले पाहिजे. विशेष म्हणजे, मोहसीन शेखरी या आंदोलकांना फाशी दिल्याच्या काही दिवसानंतरच ही दुसरी फाशीची बातमी आली आहे. इराणमधील सेंटर फॉर ह्युमन राइट्सच्या म्हणण्यानुसार, इराणमध्ये सुरू असलेल्या निषेधांमध्ये किमान 10 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गेल्या सप्टेंबरपासून इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सुरू आहे. हिजाब नीट न घातल्यामुळे पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतले होते, तिथेच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर महिलांचे देशभर आंदोलन पेटले आहे. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.​​​​​​ जगभरातून या आंदोलनाला ‘वुमन लाईफ लिबर्टी’ या बॅनरखाली प्रतिसाद मिळाला. व्यक्तिस्वातंत्र्याच्या मागणीबरोबरच ‘इस्लामिक प्रजासत्ताक बरखास्त करा आणि सर्वोच्च नेते अली खोमेनी यांना पदभ्रष्ट करा’ अशा घोषणा दिल्या गेल्या.

इराणमधील महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोल केलेच, पण काही महिला सोशल मीडियावर अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत आहेत. अनेक महिलांनी स्वतःचे केस कापतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इतर महिलाही विविध मार्गाने निषेध नोंदवत आहेत. निदर्शने करताना अनेक महिलांनी आपले हिजाबही काढून रस्त्यावर फेकले. अनेक ठिकाणी हिजाब जाळण्यात आला.

इस्लामिक क्रांतीने कसे बदलले इराणी महिलांचे जीवन?

इराणी महिलांना हिजाब घालण्याची अट 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर लागू झाली. त्यापूर्वी, शाह पहलवीच्या राजवटीत इराण स्त्रियांच्या पोशाखाच्या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र होता. भारतात मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये आज आपण 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी आणि नंतर इराणमधील महिलांच्या जीवनातील बदलांबद्दल जाणून घेणार आहोत... संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शरीर उघडे दिसताच महिलांना ताब्यात घ्यायचे सदाचरण पोलिस

अमिनींच्या मृत्यूनंतर कुर्दिस्तानपासून तेहराणपर्यंत सदाचरण पोलिसांच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. अमिनी यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. अंत्यसंस्कारात सहभागी महिलांनी हिजाब काढून निषेध केला. हिजाबविरोधातील आंदोलनादरम्यान अनेक महिलांनी केसही कापले. जवळपास 3 महिन्यांच्या निदर्शनांनंतर इराण सरकारने सदाचरण पोलिस व्यवस्था संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.दिव्य मराठी एक्स्प्लेनरमध्ये आम्ही सांगणार आहोत की इराण सरकारने रद्द केलेले सदाचरण पोलिस म्हणजे काय आहे? इराणच्या महिला याला विरोध का करत होत्या? संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...