आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनच्या धकमीकडे दुर्लक्ष करत अमेरिकन संसदेचे खालचे सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (८२) मंगळवारी सायंकाळी तैवानची राजधानी तैपेईला पोहोचल्या. अमेरिकन लष्कराच्या २४ लढाऊ विमानांनी नॅन्सी यांच्या विमानाला संरक्षण दिले. या दौऱ्यावरून चीनने दिलेल्या धमकीमुळे अमेरिकेने ४ युद्धनौका आणि एक विमानवाहू जहाज तैवानजवळ तैनात केले होते. चीननेही तैवानच्या हवाई क्षेत्रात फायटर जेट तैनात केले होते. पेलोसी यांना रोखण्यासाठी चीन विमान पाठवू शकतो, अशी शक्यता होती. सु-३५ फायटर जेटने सीमा ओलांडल्याचे वृत्तही चिनी माध्यमांनी दिले होते. तथापि, यानंतर माहिती मिळाली नाही. दौऱ्यामध्ये कोणत्याही हस्तक्षेपावर अमेरिकन विमानांना हल्ल्याची परवानगी होती.
तैवानवर वर्चस्वाची इच्छा असल्याने चीनचा थयथयाट
-पेलोसींच्या तैवान भेटीवरून चीन का भडकला?
चीन कोणत्याही गैरचिनी नागरिकांना तैवानमध्ये प्रवेश करू देत नाही. म्हणून पेलोसींना विरोध करत आहे. ही कृती म्हणजे वन चायना पॉलिसी व चीन-अमेरिका कराराचे गंभीर उल्लंघन आहे. त्यामुळे चीन-अमेरिका संबंध कमकुवत होतील. हे चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. म्हणजे हा दौरा चीनच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेपासारखा आहे. तैवानमधील शांती-स्थैर्याला धोका निर्माण होईल.
-अमेरिकेने पेलोसींना तैवानला का पाठवले?
पेलोसी तीन दशकांच्या कार्यकाळात चीनच्या कट्टर विरोधक राहिल्या. हाँगकाँगच्या २०१९ मधील लोकशाहीविरोधी आंदोलनाच्या त्या कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे त्या बीजिंगच्या निशाण्यावर आल्या होत्या. तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग-वेन यांचे प्रशासन लोकशाही मूल्यांचे समर्थक राहिले आहे. पेलोसी त्यांना पसंत करतात.
-दौऱ्यावरून तणाव का वाढला?
चीन तैवानला आपले क्षेत्र सांगत आला आहे. गरज भासल्यास तो बळाचा वापर करून वर्चस्व मिळवेल. परंतु त्यास अमेरिकेचा विरोध आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.