आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Pentagon Gives 17.5 Crore Internet Address To Suspicious Company; The Biggest Complication In Internet History Will Be Solved; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:पेंटागॉनने संशयास्पद कंपनीला दिले 17.5 कोटी इंटरनेट ॲड्रेस; इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठा गुंता सुटणार

वॉशिंग्टन17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्राध्यक्षपदावरून ट्रम्प यांच्या निरोपाआधी झाला 'खेळ'

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव व त्यांचे पद सोडण्यादरम्यान अनेक नाट्यमय व आश्चर्यकारक घटना जगाने पाहिल्या होत्या. त्यादरम्यान असेही घडले, जे इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठा गुंता झाले. ज्या वेळी जो बायडेन शपथ घेत होते व ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदावरून निरोप घेण्याच्या अंतिम टप्प्यात होते. त्या वेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने एका रहस्यमय कंपनीला अब्जावधी किमतीचे १७.५ कोटी इंटरनेट अॅड्रेस ट्रान्सफर केले. हे जगातील एकूण इंटरनेट अॅड्रेसच्या चार टक्के आहेत. याची किंमत सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे.

ज्या कंपनीला ही माहिती देण्यात आली, तिचे कागदोपत्री नाव ग्लोबल रिसोर्स सिस्टिम्स एलएलसी आहे. फ्लोरिडा राज्याच्या नोंदीनुसार कंपनीची नोंदणी पहिल्यादा ऑक्टोबर २०२० मध्ये झाली. माध्यमातील वृत्तात दावा करण्यात आला आहे की, या बनावट कंपनीने कॅलिफोर्नियाचा जो पत्ता दिला आहे तेथे कोणताही प्रतिनिधी आढळला नाही. तेथे व्यावसायिक परवानाही नाही. कंपनीने कोणत्याही फोन वा मेलला उत्तर दिले नाही व त्यांचे कोणतेही वेबपेज अस्तित्वात नाही. या कंपनीशी संबंधित जी एकमेव व्यक्ती रेमांड साउलिनोबाबत फ्लोरिडा रजिस्ट्रीत धागा सापडला तिचे नाव नेवादा काॅर्पोरेट नाेंदीत २०१८ मध्ये फॉरेन्सिक सायबर स्पेस-इंटरनेट सर्व्हिलन्स इक्विपमेंट कंपनीचा व्यवस्थापकीय सदस्य म्हणून नोंद आहे. त्याच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यात यश आले नाही. त्याच्या नावाने नांेद फोन क्रमांकावर ऑटोमेटेड उत्तर येते.

इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठी आणि रहस्यमय घटना
नेटवर्क संचालक कंपनी केंटिकचे संचालक डग मॅडोरी म्हणतात, ही इंटरनेट इतिहासातील सर्वात मोठी व रहस्यमय घटना आहे. पेंटागॉनने जो वापरला न जाणारा स्पेस ट्रान्सफर केला तो ते वापरतात त्यापेक्षा दुप्पट आहे. बायडेन यांच्या शपथविधीच्या दिवशी इंटरनेटच्या वैश्विक रूटवर एएस ८००३ नावाच्या कंपनीने घोषणा केली की, संरक्षण विभागाच्या मालकीचा न वापरला जाणारा आयपीव्ही ४ इंटरनेट स्पेस आता त्यांचा आहे.

ऑक्टोबर २०२० मध्ये अस्तित्वात आलेली कंपनी
आता या कंपनीच्या नियंत्रणात कॉकास्ट व एटीअँडटीसारख्या मोठ्या इंटरनेट पुरवठादारांपेक्षा जास्त स्पेस आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले, हा आयपी अॅड्रेसचा अनधिकृत वापर रोखण्याचा त्यांच्या मूल्यांकनाच्या प्रचाराचा पायलट प्रोजेक्ट होता. मात्र, ज्या कंपनीचे सप्टेंबर २०२० पर्यंत अस्तित्व नव्हते तिला एवढा मोठा स्पेस मॅनेज करण्यासाठी काय निवडण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर प्रवक्त्याकडे नव्हते.

३० हजार कोटींचा डेटा दिला त्याच्या पत्त्यावर कोणीच नाही

  • कॅलिफोर्नियाची कंपनी ग्लोबल रिसोर्स सिस्टिम्सने ना फोनचे उत्तर दिले ना मेलचे, वेबपेजही नाही
  • पेंटागॉन म्हणाले- हा त्रुटींच्या मूल्यांकनाचा पायलट प्रकल्प, मात्र ही कंपनी का निवडली हे सांगू शकले नाही
बातम्या आणखी आहेत...