आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • People From Foreign Countries Become Angels For Afghans, Afghan Children Cling To Security Personnel On Seeing Them; News And Live Updates

तालिबान्यांनी छळले, जगाने स्वीकारले:परदेशातील लोक अफगाणांसाठी बनले देवदूत, सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहून त्यांच्याशी मिठ्ठी मारताहेत अफगाणी मुले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्यातरी काबूल विमानतळावर अमेरिकन सैन्यांचा ताबा आहे.

तालिबान्यांनी अफगाणिस्तानाचा ताबा घेताच देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबानच्या भीतीमुळे अफगाणिस्तान सोडलेल्या अफगाणांना जग मिठीत घेत आहे. अमेरिकेसह अनेक देशांचे सैनिक काबूल विमानतळावरून लोकांना बाहेर काढत आहेत. दरम्यान, विमानात जेथे जागा मिळेल तेथे बसून लोक प्रवास करत आहेत. सध्यातरी काबूल विमानतळावर अमेरिकन सैन्यांचा ताबा असल्याचे सांगण्यात येत आहे.

अफगाणिस्तान सोडून इतर देशात जाणाऱ्या अफगाणी लोकांचा खुल्या मनाने स्वागत केले जात आहे. विशेष म्हणजे काबूल विमानतळावर बाहेर अफगाणी मुले रडत घाबरुन रडताना दिसत आहे. मात्र, विमानतळाच्या आत येताच सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहून त्यांच्यांशी घट्ट मिठ्ठी मारत आहे. विमानतळावरील भावनिक करणारे असे 10 फोटो पहा...

काबुल विमानतळावरील गर्दीमध्ये वडिलांच्या खांद्यावर बसलेला हा मुलगा तेंव्हा घाबरला जेव्हा सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.

अफगाण मुले तालिबानला इतकी घाबरतात की ते सुरक्षित ठिकाणी पोहचताच भावनिक होतात. आपल्या कुटुंबासह इटलीला पोहचलेला एक अफगाणी मुलगा विमानतळावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गळ्याला चिकटला.

अमेरिकेच्या हवाई दलाच्या विमानात जाणाऱ्या एका अफगाणी महिलेने विमानातच मुलाला जन्म दिला. या दरम्यान, लष्कराच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला आणि तिच्या कुटुंबाला जर्मनीतील रामस्टीन एअरबेसवर मदत केली.

इटलीच्या फ्युमिसिनो विमानतळावर आलेल्या अफगाण मुलांनी तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांशी मैत्री केली. ड्युटी करण्याबरोबरच पोलीस कर्मचारी अफगाणी मुलांसोबत खेळतानाही दिसत आहेत.

लॉस एंजेलिसमधील पर्शिंग स्क्वेअर येथे अफगाण वंशाच्या बहुतेक लोकांनी तालिबानविरोधी निदर्शनात भाग घेतला. या दरम्यान, अफगाण वंशाचा हस्मत अमीन आपल्या मुलीला मॅचिंग कॅप घालून आला.

लॉस एंजेलिसमध्ये तालिबानच्या विरोधात एक रॅली काढण्यात आली. या दरम्यान, लोक अफगाणिस्तानचा झेंडा आणि तालिबानविरोधी फलक घेऊन दिसले. त्यामध्ये तरुणांची संख्या जास्त होती.

लॉस एंजेलिसमधील तालिबानविरोधी रॅलीमध्ये भरतकाम केलेले हिजाब घालून अनेक महिला दाखल झाल्या होत्या.

जर्मनीच्या रॅमस्टीन एअरबेसच्या सदस्यांनी खेळणी गोळा केली. ही खेळणी अफगाणिस्तानातून आलेल्या मुलांना दिली जात आहेत. अफगाणांना मदत करण्यासाठी येथे 24 तास कर्मचारी आहेत.

बातम्या आणखी आहेत...