आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुंदर होण्यासाठी गोरा असणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते योग्य नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे स्पष्ट झाले आहे की, भारतीय लोक जगातील सर्वात सुंदर आहेत. सौंदर्याच्या बाबतीत अमेरिकन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर स्वीडन, जपान, कॅनडा आणि ब्राझीलची पाळी येते. इंग्लंडमधील स्वीमवेअर कंपनी पोर मोईने आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) जगातील ५० देशांतील लोकांच्या शारीरिक रचनेची तुलना केली. त्यामध्ये भारतीय महिला सर्वाधिक आकर्षक, तर पुरुष दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले. एआयला ब्रिटिश पुरुष जगातील सर्वात आकर्षक असल्याचे आढळले. असे असूनही ५० देशांच्या सौंदर्याच्या या यादीत ब्रिटनचे लोक १२ व्या क्रमांकावर राहिले. चिनी १६ व्या, तर पाकिस्तानी २३ व्या क्रमांकावर होते. पोर मोईच्या प्रवक्त्याने सांगितले की, एआयद्वारे रेडिटच्या माहितीचे विश्लेषण करून आम्ही शोधले की कोणत्या देशाचे लोक जगातील इतर देशांतील लोकांकडे सर्वाधिक आकर्षित आहेत. यामध्ये पोस्ट आणि अपवाेट्सची माहितीही होती. त्यावरून हे लक्षात आले की जगभरातील लोकांमध्ये भारतीय सर्वात आकर्षक आहेत.
५० देशांतील लोकांच्या छायाचित्रांवर आधारित सर्वात आकर्षक चेहरे तयार
‘रेडिट’वर शेअर केलेल्या जगातील विविध देशांच्या छायाचित्रांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मूल्यांकन करण्यात आले. चेहऱ्यांचे स्कॅनिंग केल्यानंतर एआयने ५० देशांची क्रमवारी तयार केली. यानंतर त्या देशांचे सर्वात आकर्षक चेहरेदेखील तयार केले, जे सर्वात सुंदर असल्याचे मानले जात होते.
२०१० च्या संशोधनात अमेरिकन सर्वात आकर्षक मानले गेले होते
तेरा वर्षांपूर्वी २०१० मध्ये ‘वनपोल’ने जगातील विविध देशांतील लोकांच्या आकर्षकपणावर संशोधन केले होते. सर्वेक्षणाच्या आधारे झालेल्या त्या संशोधनात असे दिसून आले हाेते की, जगातील इतर देशांतील लोक कोणत्या देशातील लोकांकडे जास्त आकर्षित होतात. यामध्येही भारत पहिल्या दहामध्ये होता. अमेरिकेतील लोक सर्वात आकर्षक मानले जात होते. ब्राझील दुसऱ्या, स्पेन तिसऱ्या, ऑस्ट्रेलियन चौथ्या क्रमांकावर हाेता. त्यामध्ये भारताला आठवे मानांकन मिळाले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.