आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • People Get Confused By The Information Overload On Self improvement, The Desire To Get Better Is Becoming A Burden

स्वयंसुधारणांवरील माहितीच्या ओव्हरलोडमुळे गोंधळून जाताहेत लोक:चांगले होण्याची इच्छा ठरत आहे ओझे

वॉशिंग्टन3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक स्वत:ला प्रेरित ठेवण्याच्या व चांगले बनण्याच्या टिप्स शोधतात. अशा वेळी हजारो टिप्स सध्या सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. कोणतेही अॅप उघडताच छोटे-छोटे व्हिडिओ आणि फोटो समोर येतात.

यात स्वत:वर लक्ष देणे, अधिक मेहनत करणे आणि वेळेचा सदुपयोग करण्यासारख्या गंभीर विषयांवर भरपूर ज्ञान असते. लाइफ कोच जिलियन मेकमिचेल यांच्या मते, सेल्फ इम्प्रुव्हमेंटशी संबंधित अमाप माहिती असलेल्या काळात आपण जगत आहोत. अशा वेळी शेकडो व्हिडिओ पाहिल्यानंतर आता लोक त्रस्त होत आहेत. संभ्रमात असलेले लोक हे सल्ले योग्यरित्या आपल्या आयुष्यात उतरवताना दिसत नाहीत. अशा वेळी चांगले बनण्याची इच्छा त्यांच्यासाठी ओझे ठरते. त्यामुळे ते सोशल मीडियावरील इतर लोकांशी आपली तुलना करायला लागतात आणि त्यांच्या मनात हीन भावना जन्माला येते. वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या जिलियन सांगतात, बहुतांश लोक सर्वकाही लवकर मिळण्याची इच्छा बाळगतात. चांगले बनण्यासाठी काय केले पाहिजे, हे कुणीतरी सांगत राहावे असे त्यांना वाटते. त्यामुळे ते सोशल मीडियाचा आधार घेतात. व्हिडिओ पाहून दबावात येतात आणि खोट्या अपेक्षा बाळगतात. तथापि, अनेक लाइफ कोच योग्य व व्यावहारिक माहिती देतात. मात्र, काही फक्त लाइक्स व व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवतात.

सोशल मीडियात चांगले पुस्तक वाचून काहीतरी चांगले करा जिलियन सांगतात, आयुष्यात बदल हवा असेल तर सोशल मीडियावर अशा प्रकारचे ढीगभर व्हिडिओ पाहू नका. एखाद्या चांगल्या लाइफ कोचचा सल्ला घ्या किंवा चांगले पुस्तक वाचा. सोशल मीडियावरील एक वा दोन चांगले लाइफ कोच निवडून त्यांचा सल्ला घेऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...