आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • People In Britain Are Haunted By Ghosts; With The Help Of Doctors From Ghost Hunters, People Are Scared To Watch Entertainment Programs| Marathi News

लंडन:ब्रिटनमध्ये लोकांना भुताची भीती सतावते; घोस्ट हंटर्सपासून डॉक्टरांचीही मदत घेतायत, लोक मनोरंजनासाठी कार्यक्रम बघून घाबरतात

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या लोकांना अलीकडे भुतांची भीती वाटू लागली आहे. आपल्या घरात असामान्य गाेष्टी अनुभवायला मिळू लागल्या आहेत. त्यामुळे काही अचानक झाेपेतच उठून बसू लागले आहेत, तर काहींना माेठ्या वस्तू कोसळल्याचा आवाज कानी पडू लागला आहे. म्हणूनच लोकांनी आता घरात साउंड डिटेक्ट डिव्हाइस व इन्फ्रारेड कॅमेरे लावण्यास सुरुवात केली आहे. अशा कॅमेऱ्यातून विशिष्ट इमेज रेकाॅर्ड करता येऊ शकेल, असे त्यांना वाटते. त्यासाेबतच शास्त्रीय पद्धतीने भुतांची आेळख पटवून देणाऱ्या घाेस्ट हंटरचीही मागणी वाढल्याचे दिसते. लंडनच्या गाेल्डस्मिथ विद्यापीठातील प्रोफेसर क्रिस्टाेफर फ्रेंच यांना वाढलेल्या अशा घटनांचे आश्चर्य मुळीच वाटत नाही. ते म्हणाले, लोकांनी रिकाम्या वेळेत पाॅडकास्ट, साेशल मीडिया व टीव्हीवरूनदेखील भीतीदायक कार्यक्रम पाहिले. गेल्या एक वर्षात माझ्याकडे अशा आशयाचे एक हजार व्हिडिआे घेऊन लोक आले आहेत.

लोक मनोरंजनासाठी कार्यक्रम बघून घाबरतातकलाकार डॅनी राॅबिन्स यांनीही द बॅटर्सी पोल्टरजिस्ट बनवले. त्याशिवाय कोरोना काळात टीव्हीवर दिवसभर ट्रम्प, ब्रेक्झिटसारखे कार्यक्रम सुरू होते. लोक मनोरंजनातून काही गाेष्टी बघतात आणि घाबरू लागतात.

बातम्या आणखी आहेत...