आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबान राजवट:काबूल शहरातील लोकांची वाटचाल पुन्हा पारंपरिक कपडे, दाढी वाढवण्याकडे

काबूल / जावेद खान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानच्या राजवटीमुळे काबूलमध्ये सायंकाळ होताच रस्ते सुनसान...

काबूलमधील जनजीवन दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. येथील शांतता वादळापूर्वीची वाटू लागली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून उठाव होईल, असे वाटू लागते. लोक राष्ट्रीय ध्वजासह रस्त्यावर मार्च करताना दिसतात. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी अशा रॅलींचे नेतृत्व महिला करत असल्याचे दिसून आले. आम्हाला आमचा सुंदर ध्वज हवा, अशी त्यांची घोषणा आहे. सर्वाधिक संताप माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांच्याविरोधात दिसून येतो. अनेक ठिकाणी तालिबानी दहशतवाद्यांचा अशी रॅली काढणाऱ्या तरुणांशी सामना होत आहे. तालिबानी दहशतवादी आंदोलकांवर भडकून त्यांच्यावर बंदुका ताणू लागले आहेत. काबूल, खोस्त, नांगरहारमध्ये अशी धुमश्चक्री दिसली. देहमाजंगपर्यंत १०-१५ किमी पायी चालून लोक घोषणाबाजी करत आहेत. आंदोलनाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे काबूलमधील जीवन पुन्हा परतू लागले आहे. बाजारपेठ तशी पूर्णपणे सुरू झालेली नाही. शहरातील काही भागातील दुकाने उघडली आहेत. काही बँकांत रांगा दिसतात. तालिबानी दहशतवादी रोखण्याची भीती प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसते. तालिबानचे शहरात फारसे अस्तित्व दिसत नाही. परंतु दररोज त्यांचे कोणते ना कोणते वाहन रस्त्यावर गस्त घालताना दिसते. परंतु आताचे काबूल ५ दिवसांपूर्वीच्या शहराहून अगदी वेगळे वाटू लागले आहे.

काबूलच्या पतनापूर्वी आणि नंतरही लोक मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर दिसून येत होते. परंतु आता मात्र रात्र होताच रस्ते सुनसान होऊ लागतात. लोकांचे कपडे बदलू लागले आहेत. तरुण क्वचितच जीन्स-टी-शर्ट घालतात दिसतात. बहुतांश लोक मात्र पारंपरिक कपडे परिधान करू लागले आहेत. सर्वांकडे साफा दिसतो. पारंपरिक आहोत असे दाखवण्यासाठी दाढी ठेवली जात आहे. येथील रस्त्यावर महिला दिसून येत नाहीत. वास्तविक काबूल शहर आधुनिक मानले जाते. येथील महिला हिजाबमध्ये फारशा दिसत नसत. आता मात्र महिला मोठ्या प्रमाणात बुरख्यात आहेत. काबूलच्या पश्चिमेकडील भाग हजाराबहुल आहे. तेथे शांतता आहे. मोहरमचा दहावा दिवस असल्यामुळे गर्दी होती. काबूलमधील एकमेव हमीद करझाई विमानतळावर सर्वाधिक दहशतीचे वातावरण दिसते. येथे उपाशीपोटी हजारो लोक परदेशात जाण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. परदेशातील सरकारसाठी काम करणाऱ्यांची संख्या येथे जास्त आहे. काही पाच दिवसांपासून विमानतळावर ठिय्या मांडून आहेत.

बातम्या आणखी आहेत...