आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • People In Tennessee Say, We See Ourselves In Trump, That's What Can Make America Great; Can Stop China And Migrants

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक:टॅनेसीतील लोक म्हणतात, ट्रम्पमध्ये आम्ही स्वत:ला बघतो, तेच अमेरिकेला महान बनवू शकतात; चीन, स्थलातरितांना रोखू शकतात

मोहम्मद अली | न्यूजर्सी (अमेरिका)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांना येशू ख्रिस्ताचा अवतार मानणाऱ्या त्यांच्या त्या बालेकिल्ल्यातील ग्राउंड रिपाेर्ट

संपूर्ण देशातल्या निवडणूक सर्वेक्षणात ट्रम्प यांचा भलेही पराभव हाेताना दिसत असला तरी अमेरिकेत काही भाग असा आहे जेथील लाेकांसाठी ते येशू ख्रिस्ताचा अवतार आणि अपराजित आहेत. अमेरिकेतील टॅनेसी हा त्या राज्यांपैकी एक आहे. या राज्यात गाेऱ्यांचे प्राबल्य आहे. पूर्ण राज्यात फेरफटका मारताना प्रत्येक ठिकाणी ट्रम्प यांचेच नाव कानावर पडते. डेमाेक्रॅटिक पक्षाला लाेक मत देत नाहीत असे नाही, पण असे माेजके लाेक आहेत.

महामार्गांवर प्रत्येक ठिकाणी लावलेल्या माेठ्या पाेस्टरवर ‘केवळ येशूच तुम्हाला वाचवू शकताे’ असे लिहिले आहे. येथील समाज खूप धार्मिक आणि पुराणमतवादी आहे. शाळांपेक्षा चर्च जास्त आहेत. माेठ्या प्रचारकांचे स्वत:चे युट्यूब चॅनल आहे. येथील लाेक ट्रम्प आणि त्यांच्या धाेरणांचे निष्ठावान समर्थक आहेत. काहींनी तर त्यांना येशू ख्रिस्ताचा अवतार म्हणून घाेषित केले आहे. या ट्युब बाबांच्या भाषेत ट्रम्प अमेरिकेत येशूचे राज्य स्थापन करतील. अशा प्रशासनासाठी येथील लाेक काहीही करायला तयार आहेत. . दैनिक भास्करने या समाजातील प्रत्येक घटकाशी चर्चा करून येथील लोकांना ट्रम्प इतके का आवडतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ३६ वर्षीय डाॅक्टर स्टीव्हन्स नेबार हे टॅनेसी येथील दुसऱ्या माेठ्या जॅक्सन हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टर आहेत. स्टीव्हन्सने २०१६ मध्ये ट्रम्प यांना मतदान केले हाेते आणि या वर्षीही त्यांनाच निवडले. त्यांच्या मतेे येथील समाज स्वत: ला ट्रम्पमध्ये पाहतो, कारण ट्रम्प खूप माेकळ्या मनाचे असून ते आपल्या मनातील काेणतीही गाेष्ट लपवत नाहीत. स्टीव्हन्स हे २०१६ च्या निवडणुकीच्या आधीपासून ट्रम्प यांचे चाहते आहेत. कारण ट्रम्प आपल्या रिअॅल्टी टीव्ही शाे आणि साैंदर्य स्पर्धेमुळे येथील समाजात लाेकप्रिय हाेते. येथील समाजाचे येशू ख्रिस्त, बंदूक बाळगण्याचे स्वातंत्र्य, गर्भपाताला गुन्हा मानणे, श्रीमंतांवर कर, भक्कम सैन्यबळ आणि स्थलांतरितांविरुद्ध कठोर कायदे या सहा गाेष्टींना जास्त प्राधान्य आहे

येथे कृष्णवर्णीयांची हत्या साजरी केली जात हाेती

अमेरिकेतल्या दक्षिण राज्यांमध्ये १९ आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत येथे कृष्णवर्णीयांच्या कत्तली हाेत हाेत्या. टॅनेसीमध्ये देखील ही परंपरा हाेती. अगदी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून कत्तलींचा आनंद साजरा केला जात हाेता.