आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यंदाची अमेरिकेची राष्ट्रपती निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरते आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येत भारतीयांचा वाटा १% असला तरी त्यांचा राजकीय आणि आर्थिक दबदबा खूप जास्त आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत भारतीयांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांसाठी ४३ कोटी रु. दिले आहेत. त्यात राष्ट्रपती ट्रम्प यांना ७.३२ कोटी मिळाले आहेत. २०१६ मध्ये भारतीयांनी ट्रम्प यांच्यासाठी २९ कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यात हाउडी मोदी इव्हेंट करणारे उद्योगपती शलभकुमार यांनी सर्वाधिक म्हणजे १० कोटी रु. दिले होते. कमला हॅरिस यांना आपला डेप्युटी निवडल्यानंतर डेमॉक्रॅट उमेदवार जो बायडेन यांच्या पाठिंब्यात आणि निधीत वाढ झाली आहे. अलीकडच्या सर्वेक्षणांनुसार, ७२% पेक्षा जास्त अनिवासी भारतीय बायडेन यांना मतदान करतील. भारतीयांना बायडेन यांच्यासाठी एकाच रात्रीत व्हर्च्युअल इव्हेंटद्वारे २४ कोटी रुपये जमवले, त्यातून हा मोठा पाठिंबा दिसून आला. हा एका रात्रीत गोळा केलेला सर्वाधिक निवडणूक निधी आहे. त्यात मोठ्या देणगीदारांनीच १४.६५ कोटींचे धनादेश बायडेन-हॅरिस यांच्या प्रचार मोहिमेसाठी दिले. त्यात समावेश असलेल्या सूरज अरोरांनी सांगितले की, ‘पंतप्रधान मोदी यांच्याशी आपली मैत्री भक्कम असल्याचे ट्रम्प सांगत असले तरी भारतीय वंशाच्या लोकांकडून निधी गोळा करण्यात ते पिछाडीवर आहेत. त्यांची धोरणे भारतीयांसाठी आणि भारतीय व्यापारासाठी वाईट आहेत. ट्रम्प यांच्या अँटी-इमिग्रेशन पॉलिसीमुळे भारतीयांचे मोठे नुकसान झाले आहे. एच-१ बी १ व्हिसावर त्यांनी अनेक निर्बंध लादले आहेत. त्या तुलनेत बायडेन यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार निवडून भारतीय-अमेरिकनांचा विश्वास जिंकला आहे.’ गेल्या वर्षी कमला हॅरिस राष्ट्रपतिपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडल्या होत्या, तोपर्यंत त्यांनी भारतीय अमेरिकींकडून २.८३ कोटी रु. गोळा केले होते. त्यांच्यापाठोपाठ तुलसी गबार्ड यांनी २.७४ कोटी रुपये जमा केले होते. तिसऱ्या स्थानी कोरी बुकर होते, त्यांना भारतीय अमेरिकी नागरिकांकडून १.८२ कोटी रुपये मिळाले होते.
भारतीय वंशाच्या लोकांनी एकाच रात्रीत बायडेन यांच्या मोहिमेसाठी गोळा केले २४ कोटी रुपये
भारतीयांची इच्छा : बायडेन, हॅरिस यांनी कलम ३७० साठी पाठिंबा द्यावा
डेमॉक्रॅट्ससाठी निधी जमवणाऱ्या समितीच्या नजीकच्या लोकांच्या मते, बायडेन आणि कमला हॅरिस यांनी काश्मीर व कलम ३७० च्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा द्यावा, अशी भारतीयांची इच्छा आहे. यापूर्वी दोन्ही नेत्यांनी या निर्णयावर टीका केली होती. दुसरीकडे, भारतीयांनी ट्रम्प यांना गेल्या वेळी दिला होता तेवढा पाठिंबा दिलेला दिसत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.