आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहानुभूती मिळवण्यासाठी लाेक नैराश्याने भरलेल्या पोस्ट टाकतात:इतरांचे लक्ष वेधण्यासाठी टूल म्हणून करतात सॅड फिशिंगचा वापर

वृत्तसंस्था2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगलवरुन साभार - Divya Marathi
गुगलवरुन साभार

दु:ख कथा, कविता किंवा एखादी दु:खद घटना. ब्रेकअपबाबत किंवा कुठेतरी अपयश आल्याची कथा. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वारंवार दु:ख आणि नैराश्येने भरलेल्या पोस्ट टाकणारे बहुतांश लोक कोणत्याच मानसिक दबावाखाली किंवा तणावग्रस्त नसतात. ते केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी सॅड फिशिंग करतात. सॅड फिशिंग म्हणजे सोशल मीडियावर नैराश्येने भरलेली पोस्ट टाकून सहानुभूती मिळवणे. अशा प्रकारे सहानुभूती मिळवणे त्यांना चांगले वाटते. ते टाकत असलेल्या पोस्टमुळे खरंच त्रस्त असलेल्या किंवा दु:खी लोकांबद्दल संवेदनशीलता राहू शकत नाही. हे माहीत असूनही त्यांना काहीच फरक पडत नाही.

जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज हेल्थमध्ये प्रसिद्ध अहवाल सांगतो, सॅड फिशिंग करणारे कॉमेंट व लाइक मोजत राहतात आणि अशाच प्रकारच्या एखाद्या दुसऱ्या पोस्टचा विचार करायला लागतात. या संशोधनाच्या प्रमुख संशोधक टेक्सास विद्यापीठातील मानशास्त्र विभागाच्या कारा पेट्रोफेस सांगतात, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यात खरंच कुणाचीतरी गरज असते त्यावेळी सॅड फिशिंग करणाऱ्यांना सहानुभूती मिळू शकत नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या प्रोफाइलवर त्यांच्या आसपास राहणारे, मित्र व नातेवाइकही असतात. वास्तव याच्या उलट आहे, हे त्यांना माहीत असते. तथापि, यापैकी एखादी व्यक्ती नैराश्य किंवा आत्महत्येच्या जवळ असूनही असी पोस्ट टाकू शकते.

संशोधकांनी सोशल मीडियावर सॅड फिशिंग करणाऱ्या ३४७ अमेरिकन्सवर संशोधन केले. हे लोक खूप तणावात असतील व कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराचा सामना करत असतील, असे संशोधनापूर्वी वाटले. मात्र, वास्तव याच्या उलट होते. सॅड फिशिंगच्या बाबतीत अद्याप बहुतांश लोकांना माहिती नाही. मात्र, हे स्पष्ट आहे की, काही लोक खरंच दु:खातून जात आहेत. त्यांना मित्रांची साथ हवी आहे. त्यामुळे तुमच्या परिचयातील एखादी व्यक्ती अशा प्रकारची पोस्ट टाकत असेल तर एकदा त्याच्याशी फोनवर बोलणे गरजेचे आहे.

लोकांचे लक्ष वेधण्यासाठी करतात सॅड फिशिंग, नंतर त्याची सवय होते सॅड फिशर आपले दु:ख वाढवून सांगतात. एक-दोनदा सहानुभूती मिळते. नंतर लोक त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. अशांपासून मित्र आणि परिचित दूर होत जातात. कारण हे लोक सोशल मीडियावर आपली पोस्ट प्रभावी ठरवण्यासाठी वास्तवातही तसेच असल्याचे सांगतात. बहुतांश सॅड फिशर तरुण आणि अल्पवयीन आहेत. ते लोकांचे लक्ष स्वत:कडे वेधण्याचे टूल म्हणून सॅड फिशिंगला सुरुवात करतात. कालांतराने ही त्यांची सवय बनते.

बातम्या आणखी आहेत...