आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकी नागरिक नववर्षाच्या सुट्या साजऱ्या करून परतत आहेत. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमायक्रॉनमुळे रोज दोन-अडीच लाख नागरिकांना संसर्ग झाल्यानंतरही लोक पुन्हा एकदा मास्क, टेस्टिंग आणि इतर सर्व काळजी घेत कार्यालय आणि शाळेत जात आहेत. बहुतांश राज्यांनी पुन्हा एकदा अलर्ट जारी करत मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांत कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत रोज दुपटीने वाढ झाली आहे. सोमवारी शाळा उघडल्या तेव्हा मुलेही रोजच्यासारखी पोहोचली. दुसरीकडे, अॅपल आणि गुगलसारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे “वर्क फ्रॉम होम’ वाढवण्याचा अलर्ट जारी केला आहे. कार्यालयांतही लोक पूर्ण काळजी घेऊन येत आहेत.
अमेरिकेत शनिवारच्या २.३९ लाख रुग्णाच्या तुलनेत रविवारी १.८५ लाख रुग्णांचे निदान झाले. विषाणूच्या वेगाने पसरणाऱ्या नव्या स्वरूपामुळे लोकांनी नाताळ आणि नववर्षाच्या आपल्या योजना लांबणीवर टाकल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकी नागरिक सामान्य दिवसांप्रमाणे सुट्यांचा आनंद घेतील, असे वाटले होते. कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येत विषाणू संसर्गामुळे हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. न्यूयॉर्कमध्ये अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काही शाळा उघडू शकल्या नाहीत.
अमेरिकेतील वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ.अँटनी फाॅउची म्हणाले की, ओमायक्रॉनची सर्वाेच्च पातळी आलेली नाही. ओमायक्रॉन गेल्या व्हेरिएंटच्या तुलनेत गंभीर नाही याचे आमच्याकडे पुरावे आहेत. अमेरिकेत मृत्यू व रुग्णालयात दाखल होण्याचा दर आधीच्या तुलनेत आतापर्यंत खूप कमी आहे.
मास्क लावा, चाचण्याही वाढवा, धोका टळला नाही...
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ.अँटीन फॉउची म्हणाले, मुलांसाठी पुन्हा शाळा उघडणे असुरक्षित नाही. फक्त थोडी आणखी काळजी घेण्याची गरज आहे. म्हणजे, मुलांनी मास्क लावण्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे आणि गरज पडल्यास चाचण्याही वाढवाव्या लागतील. आपल्याला अद्यापही कोरोना विषाणूच्या रुग्णांमुळे रुग्णालयांत लोक मोठ्या संख्येत दाखल होण्याचा धोका आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.