आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्यांना एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत असे लोक कोरोना आणि दुसऱ्या विषाणूंपासून अधिक सुरक्षित आहेत. मेडिकल जर्नल द लॅन्सेट इंफेक्शिअस डिसीसमध्ये प्रकाशित एक संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी २०२० आणि २०२१ मध्ये ब्राझीलच्या २ लाख लोकांच्या आरोग्याशी संबंधित आकड्यांचे अध्ययन केले. ब्राझीलमध्ये कोविडमुळे अमेरिकेनंतर जगातील सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ज्यांना यापूर्वी कोरोना झाला होता त्यांनी फायझर आणि अॅस्ट्राझेनका लस घेतल्यानंतर ९० टक्क्यांपर्यंत रोगप्रतिकारशक्ती मिळवल्याचे संशोधनात आढळले. तसेच मृत्यूपासूनही त्यांचा बचाव झाला.
चीनच्या कोरोनाव्हॅकसाठी हा आकडा ८१ टक्के होता आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या एका डोससाठी ५८ टक्के होता. संशोधनाबाबत भारताचे ‘ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट’चे प्रमोद कुमार गर्ग सांगतात, नैसर्गिकरित्या काेरोनामुळे निर्माण झालेली शारीरिक क्षमता आणि लसीमुळे मिळालेल्या प्रतिकारशक्तीमुळे बनलेली संमिश्र प्रतिकार क्षमताच या विषाणूपासून दीर्घ काळ बचाव करण्याच कामी येईल. सोबतच नव्याने विकसित होणाऱ्या विषाणुंपासूनही संरक्षण करेल. अशाचप्रकारचे एक संशोधन स्वीडनमध्ये झाले. ऑक्टोबर २०२१ पर्यंत या देशात कोविड रुग्णांच्या आकड्यांवर संशोधन केले. जे लोक कोरोनातून बरे झाले त्यांच्यात कोविडबाबत पुढील २० महिनेे अधिक बचाव क्षमता होती, असे यात आढळले. ज्यांच्यात दोन डोसमुळे हायब्रिड इम्युनिटी निर्माण झाली होती त्यांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका ६६ टक्क्यांपर्यंत कमी होता.
ओमायक्रॉनच्या विरोधात ५२% प्रतिकारशक्ती निर्माण केली
कतारमध्ये प्रकाशित एका संशोधनात ओमायक्रॉनवरील हायब्रिड इम्युनिटीच्या परिणामांची माहिती देण्यात आली. यात म्हटले, लसीच्या डोसने BA.2 ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात ५२ टक्के इम्युनिटी मिळाली. मात्र, ज्यांना कोरोना संसर्ग झाला होता त्यांच्यात ही प्रतिकारशक्ती ७७ टक्क्यांपर्यंत आढळली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.