आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाबाबत ब्लड ग्रुप स्टडी:A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना संक्रमणाचा जास्त धोका, अशा रुग्णांना 50% ज्यास्त ऑक्सीजनची गरज पडू शकते

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इटली आणि स्पेनच्या 1,610 कोरोना रुग्णांवर झाला अभ्यास, जीनोम सिक्वेंसिंगच्या अॅनालिसिसनंतर परिणाम जाहीर
Advertisement
Advertisement

A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना कोरोना संक्रमणाचा जास्त धोका आहे. अशा व्यक्तींमध्ये गंभीर स्वरुपाचे संक्रमण होऊ शकते, असा दावा जर्मनीच्या कील यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. त्यांचे म्हणने आहे की, इतरांपेक्षा हा ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये संक्रमणाचा धोका 6 टक्के जास्त आहे.

संशोधकांना आढळले की, A ब्लड ग्रुप असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या डीएनएचा एख खास भाग असा आहे, जो यास जबाबदार आहे. रिसर्चदरम्यान याची पुष्टी झाली आहे. यापूर्वी चीनमध्ये झालेल्या रिसर्चमध्येही A ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा धोका जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हेंटिलेटरची गरज लागेल

संशोधकांचे म्हणने आहे की, A ग्रुप असेलेल्या 50 टक्के लोकांना ऑक्सीजनची जास्त गरज पडू शकते, किंवा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागू शकते. यामुळेच तरुण आणि निरोगी व्यक्तींनाही कोरोनाची लागण होत आहे. अमेरिकेतील 40 टक्के कोरोनाग्रस्त तरुण आहेत.

मागच्या आठवड्यात 30 टक्के तरुण संक्रमित झाले

अमेरिकेतील सर्वात मोठी आरोग्य संघटना सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) नुसार, मागच्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या 30 % कोरोना रुग्णांचे वय 18 ते 49 दरम्यान होते. ब्लड ग्रुप-ए असलेल्या कोणत्या वयांच्या लोकांमध्ये संक्रमणाचा जास्त धोका आहे, याचा शोध घेतला जात आहे.

डीएनए रिपोर्टमध्ये कॉमन पॅटर्न दिसला

संशोधकांनी इटली आणि स्पेनमधील अशा कोरोना पीडितांचे डीएनए सँपल घेतले, ज्यांना श्वसनास त्रास होत आहे. दोन्ही देशांमधील 1,610 रुग्णांचा जीनोम सिक्वेंस तपासण्यात आला. संशोधकांचे म्हणने आहे की, यांच्या डीएनए रिपोर्टमध्ये एक कॉमन पॅटर्न दिसला, जो यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो. यांच्या रिपोर्ट 2,205 गंभीर नसलेल्या रुग्णांच्या रिपोर्टशी जुळवून पाहिल्या. यातून आढळले की, डीएनएचे दोन जीन्स असे आहेत, जे 1,610 रुग्णांची परिस्थिती गंभीर करण्यास कारणीभूत ठरत आहेत.

ब्लड ग्रुप-ओ असलेल्या व्यक्तींमध्ये कमी धोका

संशोधकांचे म्हणने आहे की, O ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींमध्ये संक्रणाचा धोका कमी आहे. ब्लड ग्रुप-ए असलेल्या व्यक्तींच्या इम्यून सिस्टीममुळे धोका वाढू शकतो. 

Advertisement
0