आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Performed 3,182 Pushups, Set Guinness World Record The Athlete Was Suffering From An Incurable Disease | Marathi News

3,182 पुशअप्स केले, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला:असाध्य आजाराने ग्रस्त होता खेळाडू, व्यायामाने वेदनांवर केली मात

ऑस्ट्रेलिया14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने आपल्या उपचार होऊ शकत नसलेल्या आजाराशी झुंज देत एका तासात 3,182 पुशअप्स करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आणि विजेतेपद पटकावले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जाहीर केले की, अ‍ॅथलीट डॅनियल स्कालीने पुरुषांच्या गटात गेल्या वर्षीच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विजेत्या जराड यंगचा 100 हून अधिक पुश-अप करून विक्रम मोडला. हे त्याचे दुसरे गिनीज जेतेपद असल्याचा दावा डॅनियलने केला आहे. जराड यंगने गेल्या वर्षी एका तासात 3,054 पुश-अप केले होते.

विक्रम मोडण्यामागची कहाणी
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, डॅनियल 12 वर्षांचा असताना त्याचा हात मोडला होता. यातून त्याला कॉम्प्लेक्स रीजनल पेन सिंड्रोम (CRPS) विकसित झाला, ज्यामुळे त्याला असह्य वेदना होत होत्या.

हाताचे दुखणे इतके तीव्र होते की हाताला थोडासाही स्पर्श, हालचाल, वारा किंवा पाण्याचा त्रास होत होतो. हाताच्या दुखण्यामुळे डॅनियलला अनेक महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले, पण या असह्य वेदनांवर उपचार करण्याचा मार्ग त्याने व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून शोधला.

बातम्या आणखी आहेत...