आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Persiverence Rover Updates: Pure Oxygen Created From The Atmosphere Of Mars; Gained 5 Grams Of Oxygen; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नासाने रचला इतिहास:मंगळाच्या वायुमंडळातून तयार केला शुद्ध प्राणवायू; 5 ग्रॅम ऑक्सिजन मिळवला

वॉशिंग्टन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोव्हरने मॉक्सी नावाच्या उपकरणाद्वारे मंगळातील वायुमंडळातून कार्बन डायऑक्साइड घेऊन श्वसनासाठी 5 ग्रॅम शुद्ध प्राणवायू निर्माण केला

नासाच्या पर्सिव्हरेन्स रोव्हरने ६३ दिवसांनंतर आपल्या मुख्य उद्दिष्टांपैकी एकामध्ये यश मिळवले आहे. रोव्हरने मॉक्सी नावाच्या उपकरणाद्वारे मंगळातील वायुमंडळातून कार्बन डायऑक्साइड घेऊन श्वसनासाठी ५ ग्रॅम शुद्ध प्राणवायू निर्माण केला. हा ऑक्सिजन एका अंतराळविराला १० मिनिटे पुरणार आहे. नासाच्या म्हणण्यानुसार एखाद्या ग्रहावर श्वास घेण्यायोग्य प्राणवायू तयार करण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. नासाचे तज्ज्ञ म्हणाले, प्रारंभी उत्पादन किरकोळ होते. परंतु या प्रयोगातून नैसर्गिक संसाधनांतून इतर ग्रहाच्या वातावरणाचा मानवाला थेट श्वास घेण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो, हे लक्षात आले आहे.

अंतराळ तंत्रज्ञान मोहीम संचालनालयाचे संचालक ट्रडी कोटर्स म्हणाले, २०३३ पर्यंत मंगळावर मानव पोहोचवणे असा नासाचा उद्देश आहे. यासंबंधी येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंगळावर प्राणवायू तयार करणे हेदेखील त्या आव्हानांपैकीच आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोबत घेऊन जाणे व्यवहार्य ठरत नाही. म्हणूनच मंगळावर प्राणवायू तयार करणे गरजेचे आहे.

कसा बनवला ?
मॉक्सी हे नासाचे मार्स ऑक्सीजन इन सीटू रिसोर्स युटिलायझेशन नावाचे उपकरण आहे. मंगळ ग्रहावरील कार्बन डायऑक्साईडचा वापर करून प्राणवायूचे उत्पादन करणे असा त्यामागील उद्देश आहे. हे उपकरण इलेक्ट्रोलायसिस पद्धतीवर आधारित असून त्याद्वारे असीम उष्म्याच्या साह्याने कार्बनडाय ऑक्साईडमधून कार्बन व ऑक्सीजनला विलग केले जाते. मंगळावर गॅसची कमतरता नाही. कारण तेथे ९५ टक्के वायूमंडळ यातूनच बनलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...