आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांपूर्वी प्रमुख विरोधी मजूर पक्ष भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यासाठी डिनर पार्टीचे आयोजन करून त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली जात आहे. मात्र, त्या पक्षाने लेस्टरच्या स्थानिक निवडणुकीत सर्व हिंदूंसह भारतीयांची तिकिटे कापली आहेत. यामुळे नाराज झालेल्या भारतीयांनी मजूर पक्षावर ढोंगीपणा आणि दुटप्पीपणाचे आरोप केले आहेत. मजूर पक्षाला भारतीयांचा पाठिंबा कमी होत आहे. ब्रिटनमध्ये स्थानिक निवडणूक दुसरी महत्त्वाची निवडणूक मानली जात असून त्याकडे सार्वत्रिक निवडणुकीचा कल म्हणूनही पाहिले जाते. भारतीयांना आकर्षित करण्यासाठी नुकत्याच झालेल्या स्नेहभाेजनात, मजूर पक्षाचे नेते केयर स्टॉर्मर आणि लंडनचे महापौर सादिक खान यांनी ब्रिटनच्या विकासात लाखो दक्षिण आशियाई वंशाच्या वाढत्या भूमिकेवर भर दिला.
३% भारतीय निवडणूक निकालावर परिणाम करण्यात सक्षम सुमारे २० लाख भारतीय ब्रिटनच्या लोकसंख्येच्या 3% असून हा सर्वात मोठा स्थलांतरित समुदाय आहे. भारतीय समुदाय हा सर्वात वेगाने वाढणारा, शिक्षित आणि सर्वाधिक कमाई करणारा गट आहे. निवडणूक निकालांमध्ये भारतीयांची निर्णायक भूमिका असते. २०१९ च्या निवडणुकीत भारत किंवा पाकिस्तानचे ३० उमेदवार हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आले. यामध्ये पंतप्रधान ऋषी सुनक यांचा समावेश आहे. यंदा अधिक उमेदवार रिंगणात असतील.
अनेक नाराज नगरसेवक आता हुजूर पक्षाच्या तंबूत दाखल लेस्टरच्या स्थानिक निवडणुकीत आपल्या नेत्यांना तिकीट न दिल्याने भारतीय समाजात नाराजी आहे. २०१५ पासून नगरसेवक असलेले हेमंत राय भाटिया यांना पक्षाने तिकीट दिले नाही. मजूर पक्षातील लोकशाही संरचना आता कोलमडली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. स्टारमर स्थानिक नेतृत्वाबद्दल बोलतात, पण उलट वागतात. भाटिया आणि दुसरे रश्मीकांत जाेशी हुजूर पक्षात गेले आहेत. भारतीय समुदायही हुजूर पक्षाला पाठिंबा देईल, असे त्यांचे म्हणणे आहे. रिता पटेल, पद्मिनी चामुंड, नीता सालंकी आणि महेंद्र वलंद अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. यामुळे मजूर पक्षाच्या मतांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.
एका दशकात कामगारांचा पाठिंबा २०% घटला सर्वसाधारणपणे भारतीय डाव्या बाजूच्या मजूर पक्षाला मतदान करत आले आहे, परंतु आता ते हळूहळू हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) पक्षाकडे वळत आहेत. जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्रा. देवेश कपूर सांगतात की, भारतीयांचा मजूर पक्षाकडे कल पूर्वीसारखा राहिलेला नाही. २०१० मध्ये, ६१% लेबरला आणि २४% ने टोरी पक्षाला पाठिंबा दिला. आता मात्र ४०% लेबरला, ३०% हुजूर (कंझर्व्हेटिव्ह) आणि १०% इतर पक्षांना पाठिंबा देतात. एका सर्वेक्षणात ४०% हिंदूंनी कंझर्व्हेटिव्ह पक्ष हिंदूंच्या जवळ असल्याचे सांगितले. मात्र, त्याच प्रमाणात शीख आणि मुस्लिमांनी मजूर पक्षाबाबत समान मत व्यक्त केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.