आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इनोव्हेशन:मातीच्या भांड्यात सूर्यप्रकाशात चार्ज होणारे प्यूरीफायर तयार; यामुळे बल्ब पेटतो आणि स्वच्छ हवाही मिळते

लीमा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पेरूच्या तरुणाने जीवशास्त्र व सौरऊर्जेपासून बनवले 7 हजार रु. किमतीचे उपकरण

पेरूचे ३१ वर्षीय आंत्रप्रेन्योर हर्नन अॅस्टो कॅबेजस यांनी जीवशास्त्र व सौरउर्जेच्या साहाय्याने मातीच्या भांड्यात अनोखे प्यूरीफायर तयार केले. ते सूर्यप्रकाशात चार्ज होते आणि हवा शुद्ध करते. तसेच दोन मोबाइलही एकाच वेळी चार्जही करते. या ऊर्जेपासून १२ तास एक बल्बही चालतो. या प्यूरीफायरला ‘अॅलिंटी’ नाव देण्यात आले आहे. याची िकंमत ९७ डॉलर म्हणजे (सुमारे ७ हजार रु.) इतकी आहे. या संशोधनासाठी त्यांना संयुक्त राष्ट्राकडून पुरस्कारही देण्यात आला आहे. पेरुच्या हुआंता येथील रहिवाशी हर्नन संशोधन कार्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितले, हा प्युरीफायर इलेक्ट्रोजेनिक सूक्ष्म जीवांच्या पाच प्रजाती, ट्यूबरस रूट फायटोमेंडिएटर प्लँट व तीन प्रकारच्या खनिजातील माती व सोलर पॅनेलमुळे कार्यरत राहते. मातीचे इव्हॅपोरेटिंग कुलिंग सोलर पॅनलच्या ओव्हर हीटिंगमुळे दहा डिग्रीपर्यंत कार्य करते. हर्नन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनासाठी २२ लाख रुपये खर्च केले. परंतु आता यास आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने निधी उपलब्ध झाला आहे. हिस्ट्री चॅनलने ३० लाख रुपये व पेरूच्या एसान विद्यापीठाने व स्पेनच्या माद्रिद विद्यापीठाने ७५ लाख रुपये निधी दिला. भारतात हे तंत्रज्ञान देण्यासाठी त्यांनी म्हटले, भारत देश कोणत्याही स्टार्टअपसाठी मोठे मार्केट आहे. हे प्राॅडक्ट तयार करण्यासाठी एक कंपनी शोधत आहोत असे त्यांनी सांगितले.

अशी सुचली कल्पना; घरी वीज नव्हती, मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास
हर्नन म्हणाले, ‘१४ वर्षाचा होईपर्यंत माझ्या घरी विज नव्हती. मेणबत्ती लावून अभ्यास केला. यामुळे मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास केला. त्यामुळे हवा प्रदूषित होत असे. व श्वसनासही त्रास व्हायचा. तंत्रज्ञानाचा काही वापर करून वीज वापर आणि हवेचे शुद्धीकरण दोन्ही बाबी व्हाव्यात असे वाटले. त्यानंतर मी माती व वनस्पतींवर संशोधन केेले. नंतर रोपांवर संशोधन करून प्यूरीफायर तयार केला.