आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी 79 व्या वर्षी निधन झाले. मुर्शरफ दीर्घकाळापासून अमायलोइडोसिस या आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून दुबईच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन ज्या आजारामुळे झाले त्या 'अमायलोइडोसिस' आजाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नेमका हा आजार काय असतो, मानवी शरीरावर कसा परिणाम करतो, प्रामुख्याने या आजाराचा सर्वात जास्त धोका कोणाला होतो. या आजाराने ग्रस्त रुग्णावर कशा पद्धतीने उपचार केले जातात, यासह अनेक प्रश्नांची उकल आपण आज करणार आहोत.
अमायलोइडोसिस म्हणजे काय?
अमायलोइडोसिस हा अशा प्रकारचा समूह असतो. ज्यात शरीरात अमायलोइड नावाचे असामान्य प्रथिने तयार होतात. अमायलोइड प्रथिने अखेरीला अवयवांचे नुकसान करतात. अवयव निकामी होऊ शकतात. ही स्थिती दुर्मिळ आहे. साधारणत:अमायलोइड यकृत, प्लीहा, कळी, हृदय, नसा, रक्तवाहिनी तर कधी कधी अमायलोइड संपूर्ण शरीरात जमा होतात. याला सिस्टिमिक किंवा ह्युमन अमायलोइडोसिस म्हणतात.
अमायलोइडोसिस आजाराची लक्षणे काय
अमायलोइडोसिस कशामुळे होतो?
मुळात अमायलोइड प्रथिने जमा झाल्यामुळे हा आजार होतो. शरीरातील प्रभावित अवयव किंवा भाग अमायलोइडोसिसच्या प्रकारावर अवलंबून असतात. अमायलोइडोसिसचे काही प्रकार आनुवंशिक असतात. तर काही अन्य कारणांमुळे होते. दीर्घकाळ डायलिसिसवर असलेली व्यक्तीला होण्याची शक्यता. काही दुर्मिळ रोगांची जडण असलेल्या व्यक्तीला.
धोका कोणाला आहे?
कोणत्या गुंतागुंत होऊ शकतात ?
अमायलोइडोसिसमुळे अमायलोइड जमा होणार्या कोणत्याही अवयवाचे संभाव्य नुकसान होऊ शकते, म्हणूनच योग्य निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. या आजारामुळे खालील प्रकारच्या गुंतागुंती शरीरात निर्माण होवू शकतात.
हृदयावर परिणाम :
अमायलोइडोसिसमुळे तुमच्या हृदयाच्या विद्युत प्रणालीमध्ये व्यत्यय आणते. त्यास प्रभावीपणे मारणे कठीण करते. हृदयातील एमायलोइडमुळे ताठरता येते. हृदयाचे पंपिंग कार्य कमकुवत होते. ज्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होतो आणि रक्तदाब कमी होतो.
मूत्रपिंडाचे नुकसान :
किडनीच्या आत असलेल्या फिल्टरला झालेल्या नुकसानीमुळे या बीनच्या आकाराच्या अवयवांना रक्तातील कचरा काढून टाकणे कठीण होते. अखेरीस, तुमचे मूत्रपिंड जास्त काम करू शकतात आणि तुम्हाला मूत्रपिंड निकामी होऊ शकतात.
मज्जातंतूवर विपरीत परिणाम
जेव्हा अॅमिलॉइड मज्जातंतूंमध्ये तयार होते. तेव्हा त्याचे नुकसान करते. तेव्हा तुम्हाला वेदना जाणवू शकतात. जसे की तुमच्या बोटांमध्ये आणि पायाची बोटे सुन्न होणे किंवा मुंग्या येणे. ही स्थिती इतर मज्जातंतूंवर देखील परिणाम करू शकते. जसे की आतड्यासंबंधी हालचाली किंवा रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या असतात.
या आजाराविषयी डॉ. शरद बिरादार यांच्याकडून जाणून घेऊया....
औरंगाबाद शहरातील माणिक हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. शरद बिरादार यांनी सांगितले की, अमायलोइडोसिस हा आजार दुर्मिळ आजार आहे. या आजाराच्या प्रमाणाविषयी विचार केला तर 2 लाख लोकांमध्ये साधारण 3 लोकांमध्ये हा आजार उद्भवतो. या आजाराचे लक्षण दिसून येत नाही. त्यामुळे निदान होण्यास विलंब लागतो. अन्य आजारांप्रमाणे या आजाराचे लक्षणे असतात, ज्यामध्ये थकवा, अशक्तपणा, जॉईंट दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. प्रामुख्याने मानवी शरीरातील मुख्य अवयवांमध्ये अमायलोइड नावाचा बॅड प्रथिने तयार होतात. त्यामुळे संबंधित अवयवावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
विविध चाचण्या कराव्या लागतात
प्रामुख्याने हृदय, किडनी, मेंदू, लिव्हर अशा प्रमुख अवयवांमध्ये बॅड प्रथिने जमा व्हायला सुरूवात होते. त्याचे प्रमाण जास्त झाले की, या आजाराचा विपरीत परिणाम व्हायला सुरूवात होते. यासाठी ज्या अवयवावर परिणाम होत असेल काही लक्षणांमुळे त्रास व्हायला सुरूवात झाली. की विविध चाचण्या कराव्या लागतात.
उदाहरणार्थ- हृदयासंबंधित दुखणे सुरू झाल्यास हृदयासंबंधित तपासण्या कराव्या (उदा. बायोप्सी) लागतात. किडनीसंबंधित अमायलोइडोसिसमध्ये तशाप्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या किंवा उपचारप्रक्रिया ही महागडी असते. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, परंतू उपचाराने त्याचे प्रमाण कमी करता येते. तर काही वेळा संबंधित अवयवाला प्रत्यारोपण केल्याशिवाय पर्याय नसतो.
हे ही वाचा सविस्तर
पाकिस्तानचे माजी लष्करशहा मुशर्रफ यांचे निधन:दुबईच्या रुग्णालयात सुरू होते उपचार, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पाकिस्तानी मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मुशर्रफ दीर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.- येथे वाचा संपूर्ण वृत्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.