आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीटीपीविरुद्ध उभे राहिले स्वात खोऱ्यातील लोक:पेशावर ठरले 40 वर्षांपासून संघर्षाचे केंद्र; टीटीपी समस्या

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावरच्या मशिदीत झालेला दहशतवादी हल्ला प्रादेशिक हत्याकांडातील ताजे उदाहरण आहे. पेशावर ४० वर्षांपासून प्रादेशिक संघर्षाशी झगडत आहे. १९८० च्या दशकात येथे सोव्हियत समर्थित अफगाण सरकारविरोधात लढणाऱ्या बंडखोरांचा मंच होता. २००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट संपुष्टात आली. तेव्हा हजारो तालिबानी आणि अल कायदाच्या सदस्यांनी कथितरित्या येथील आदिवासी क्षेत्रात आश्रय घेतला. तेव्हा अनेक वर्षे तालिबानने पाकिस्तानींची विशेषत: पश्तूनींची आपल्या गटात भरती केली. तेव्हा पाकिस्तानी लष्कराने त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता. २००७ पर्यंत अतिरेक्यांच्या एका गटाने स्वत: नेतृत्वाचा दावा केला आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान(टीटीपी) नाव दिले. त्याने लगेच घातक हल्ल्याला मूर्त स्वरूप दिले. यामुळे पाकिस्तान सर्वात घातक दहशतवादी संघटनांपैकी एक म्हणून पुढे आला. त्यावेळसही पेशावर संघर्षाचे केंद्र होते. टीटीपीने सर्वात मोठा हल्ला डिसेंबर २०१४ मध्ये केला. तेव्हा लष्कराकडून चालवल्या जाणाऱ्या शाळेत १४७ विद्यार्थी आणि शिक्षकांची हत्या केली होती. टीटीपीचे प्रभाव क्षेत्र स्वात खोऱ्यात पुन्हा एकदा अतिरेकी एकत्र येत हल्ले करत आहेत. श्रीमंत व्यावसायिक, नेते आणि डॉक्टरांना फोन करून खंडणी मागितली जात आहे. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना स्वात खोरे सोडावे लागत आहे. वसुली, धमकी आणि हिंसाचारामुळे हजारो लोक ऑक्टोबरमध्ये रस्त्यावर उतरले होते.नागरिकांनी खंडणीखोर टीटीपीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.

सैन्याच्या कारवाईवर संशय, लोक सुरक्षित स्थळी जाताहेत पाकिस्तानने दहशतवादविरोधी मोहीम राबवल्यास अफगाणिस्ताशी तणाव वाढेल. दुसरीकडे,लोक सरकारच्या प्रतिक्रियेच्या योजनेची वाट पाहत बसण्यापेक्षा सुरक्षित शहरांत पलायन करण्याचा विचार करत आहेत. एक ख्रिश्चन स्वच्छता कर्मचारी मुख्तियार मसीहने सांगितले की, पाकिस्तानमध्ये एकही शहर सुरक्षित नाही. अशा स्थितीत पेशावरच्या तुलनेत एखाद्या सुरक्षित शहरात जाणे योग्य राहील.

बातम्या आणखी आहेत...