आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pew Research Center Survey | Young People In European Countries Are More Likely To Live With Their Parents Than In The US

अध्ययन:प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष; अमेरिकेच्या तुलनेत युरोपीय देशांचे तरुण पालकांसोबत जास्त राहतात

वृत्तसंस्था| वाॅशिंग्टन/ लंडन23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये तरुणाईला त्यांच्या पालकांसोबत राहणे आवडत नाही, मात्र २ दशकांपासून हा ट्रेंड बदलला आहे. आता अमेरिकन तरुणांपेक्षा युरोपीय देशांतील तरुण त्यांच्या पालकांसोबत जास्त राहतात. अमेरिकेत तरुणांनी आई-वडिलांसोबत राहणे समाजासाठी वाईट मानले जाते. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यूएस सेन्सस ब्युरोनुसार, १८ ते ३४ वयोगटातील ३ पैकी फक्त १ तरुण आई-वडिलांच्या घरी राहतो.

अमेरिकेत, तरुणांपेक्षा जास्त तरुणी त्यांच्या पालकांसोबत राहतात. दुसरीकडे, दोन डझनहून अधिक युरोपीय देशांमध्ये, सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक घटक, तसेच गृहनिर्माण बाजार आणि कल्याणकारी प्रणालीमुळे तरुण मोठ्या प्रमाणात पालकांसोबत राहतात. प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, २९ युरोपीय देशांपैकी २४ मध्ये १८ ते ३४ वयोगटातील तीन तरुणांपैकी दोन पालकांच्या घरी राहतात. पाच देशांमध्ये दहापैकी सात तरुण त्यांच्या पालकांसोबत राहतात. क्रोएशियामध्ये ७७%, ग्रीसमध्ये ७३%, पोर्तुगालमध्ये ७२%, सर्बियामध्ये ७१% आणि इटलीमध्ये ७१% आहे. फिनलंडमधील 18% तरुण, स्वीडनमध्ये १७% तरुण त्यांच्या पालकांसोबत राहतात.