आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण:ट्रम्प प्रशासनाच्या धमकीनंतर फायझरच्या वापराला परवानगी, पहिल्या टप्प्यात 64 लाख डाेस

न्यूयाॅर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायझरच्या लसीकरणासाठी परवानगी देणारा अमेरिका सहावा देश

फायझर व बायाेएनटेकच्या लसीला आपत्कालीन परिस्थितीत वापरास अमेरिकेत परवानगी देण्यात आली आहे. तज्ञांनी या लसीच्या वापरासाठी हिरवा कंदील दाखवला हाेता. परंतु नंतर त्याबाबतचा निर्णय अमेरिकेतील सर्वाेच्च एफडीएच्या विचाराधीन हाेता. अनेक तास त्यावर चर्चा सुरू असतानाच ट्रम्प प्रशासनाने दबाव वाढवला. त्यामुळे एफडीएलादेखील आपली मंजुरी द्यावी लागली.व्हाइट हाऊसचे चीफ आॅफ स्टाफ मार्क मिडाेज यांनी एफडीएचे कमिशनर स्टीफन हान यांच्याशी फाेनवरून संभाषण केले. सायंकाळपर्यंत लसीकरणाला परवानगी देण्यात यावी किंवा राजीनामा देऊन दुसरी नाेकरी शाेधावी, असे सांगण्यात आले हाेते. त्यामुळेच एफडीएने परवानगी दिल्याचे सांगितले जाते. या लसीला मंजुरी देणारा अमेरिका सहावा देश ठरला आहे.

ब्रिटन, बहरिन, कॅनडा, साैदी अरेबिया, मेक्सिकाेने या लसीला परवानगी दिली आहे. युराेपीय संघदेखील लवकरच त्याच्या वापराबाबत निर्णय घेणार आहे. फायझरने भारतातदेखील आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे. आज आमच्या देशाने वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार करून दाखवला आहे. केवळ नऊ महिन्यांत लाेकांना सुरक्षित व प्रभावी लस उपलब्ध हाेणार आहे, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. चाेवीस तासांत लसीकरण सुरू हाेईल, अशी घाेषणाही ट्रम्प यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात 64 लाख डाेस म्हणजे ३२ लाखांवर लसीकरण
अमेरिकेत डिसेंबरअखेर ६४ लाख डाेस देण्याची फायझरची याेजना आहे. एका व्यक्तीला दाेन डाेस दिले जातील. म्हणजेच ३२ लाखांवर लसीकरण केले जाईल.

अमेरिकेची लाेकसंख्या ३३ काेटी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात २.१ काेटी आराेग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत अमेरिकेत सहमती आहे. मात्र त्यानंतर डाेस वृद्धांना द्यावा की गरजू कर्मचाऱ्यांना द्यावा, याबाबत सहमती दिसत नाही. फायझर मार्चपर्यंत अमेरिकेला १० काेटी डाेस उपलब्ध करून देईल. माॅडर्नाच्या लसीलादेखील लवकरच परवानगी मिळू शकते. २०२१ च्या जुलै-आॅगस्टपर्यंत संपूर्ण लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याची अमेरिकेची याेजना आहे.

युरोपात एकाच दिवसात ५ ,४९४ जणांनी गमावले प्राण
अमेरिकेत संसर्ग अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे सरकारसमाेर अनेक समस्या आहेत. शुक्रवारी २.४६ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. या महामारीने अमेरिकेत आतापर्यंत ३ लाख २ हजार ७६२ जणांना प्राण गमवावे लागले. दुसरीकडे जगभरात दर चाैथ्या दिवशी १२ हजारांवर लाेकांचा मृत्यू झाला. शुक्रवारी एकूण १२ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाला. युराेपात २.३३ नवे रुग्ण आढळून आले. ५ हजार ४९४ जणांनी एकाच दिवसात प्राण गमावले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser