आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सीनवर अमेरिकेत अभ्यास:फायजर आणि मॉडर्नाच्या व्हॅक्सीन पहिल्या डोसनंतर 80% प्रभावी, दुसऱ्या डोसनंतर संक्रमणाचा धोका 90% कमी

वॉशिंग्टन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 पेक्षा जास्त देशांमध्ये एस्ट्राजेनेका लसीवरील बंदी हटवली

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान अमेरिकन कंपनी फायझर आणि मॉडर्ना या लसीबद्दल चांगली बातमी आली आहे. अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार असा दावा करण्यात आला आहे की पहिला डोस घेतल्यानंतरही या दोन्ही कंपन्यांच्या लस बर्‍यापैकी प्रभावी आहेत. या लसींचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनंतर, संसर्गाची शक्यता 80% पर्यंत कमी होते. तर दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांनंतर, धोका 90% कमी होतो.

4000 लोकांवर केला अभ्यास
लसी घेतलेल्या अमेरिकेतील 4000 लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार हा डेटा समोर आला आहे. त्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हा अभ्यास अमेरिकन रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रांनी (CDC) केला होता. यामध्ये संसर्गापासून बचाव करण्यासाठी लस किती प्रभावी आहे यावर मूल्यमापन केले गेले. CDC चे संचालक रोशेल वॅलेन्स्की म्हणतात की या अभ्यासानुसार असे दिसून येते की आमचे लसीकरण प्रयत्न प्रभावी सिद्ध होत आहेत.

फायझर लसीचे दुष्परिणाम समोर आले होते
जेव्हा फिनलँड आणि बल्गेरियातील लसीच्या दुष्परिणामांची प्रकरणे आढळली तेव्हा फायझरच्या लसबद्दल सुमारे तीन महिन्यांनंतर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. औषध एजन्सीचे कार्यकारी संचालक बॉग्डन किरिलोव यांनी सांगितले की बुल्गारियामध्ये ज्या 4 लोकांमध्ये लसीचे दुष्परिणाम आढळले होते, त्यापैकी दोन जणांनी वेदनांची आणि दोन जणांनी सुस्ती आणि टेम्परेचर वाढण्याची तक्रार केली होती. यापूर्वी फिनलँडमध्ये पाच लोकांमध्ये गंभीर साइड इफेक्ट पाहायला मिळाले होते.

कॅनडामध्ये 55 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस देण्यास मनाई
कॅनडामध्ये 55 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्डची कोरोना लस दिली जाणार नाही. असे मानले जात आहे की ब्लड क्लॉट सारखे साइड इफेक्टची तक्रार मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे लसीकरणासाठी राष्ट्रीय सल्लागार समितीने ही बंदी घातली आहे.

15 पेक्षा जास्त देशांमध्ये एस्ट्राजेनेका लसीवरील बंदी हटवली
यापूर्वी जर्मनी, इटली आणि फ्रान्ससह 15 हून अधिक देशांनी अ‍एस्ट्राजेनेका लस वापरण्यास तात्पुरती बंदी घातली होती, जी आता मागे घेण्यात आली आहे. लसीवरील बंदीमागील दावा असा होता की लसीकरण झालेल्या काही लोकांच्या शरीरात रक्त गोठणे (ब्लड क्लॉटिंग) ची समस्या होत होती. पण हे लसीमुळेच झाले याचा ठोस पुरावा नाही.

बातम्या आणखी आहेत...