आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pfizer Vaccine Less Effective But Appears To Still Protect Against More Transmissible Covid Variant Found In India; News And Live Updates

फ्रान्समधील अभ्यासात दावा:फायझरची लस कमी प्रभावी, परंतु भारतात आढळणार्‍या व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यास सक्षम

पॅरिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवहालासाठी 28 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा नमुना घेण्यात आला

फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, कोरोनाबाधीत रुग्णांवर फायझर लस ही कमी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. परंतु, भारतात आढळणाऱ्या कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी ही लस सक्षम असल्याचा दावा या स्टडीमध्ये करण्यात आला आहे. फायझर ही लस B.1.617 व्हेरिएंटच्या विरूद्ध काम करत असल्याचे संस्थेचे संचालक आणि या स्टडीचे सह-लेखक ऑलिव्हियर श्वार्ट्ज यांनी सांगितले. नुकतेच त्यांचा हा स्टडी एका वेबसाइटवर प्रसिद्ध झाला आहे.

अवहालासाठी 28 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा नमुना घेण्यात आला
ऑरलियन्स शहरातील 28 आरोग्य कर्मचाऱ्यांचा नमुना या अवहालासाठी घेण्यात आला होता. त्यामधील 16 लोकांना फायझर लसीचे दोन्ही डोस दिले गेले असून इतर 12 जणांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीचा एक डोस देण्यात आला होता. या अभ्यासानुसार, ज्या लोकांना फायझर लसीचे डोस देण्यात आले होते, त्यामध्ये B.1.617 व्हेरिएंटच्या विरूद्ध काम करणाऱ्या अँटीबॉडीमध्ये तीन पटीने घट पाहायला मिळाले. परंतु, त्यानंतरही ते सुरक्षित आहे.

श्वार्ट्ज पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी जे लोक कोरोनाबाधीत झाले होते त्यांना फायझर लसीचे दोन देण्यात आले होते. त्यामध्ये भारतात आढळणाऱ्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी पुरेशी अँटीबॉडी होती. परंतु, ही अँटीबॉडी यूकेतील अँटीबॉडीच्या 3 ते 6 पटीने कमी होती.

भारतात आढळणारा हा व्हेरिएंट 53 देशात पोहचला
कोरोना व्हायरसची सुरुवात 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरातून झाली आहे. या महामारीला SARS-CoV-2 या नावाने ओळखले जात असून याने आतापर्यंत कित्येक प्रकार बदलले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि यूकेच्या व्हेरिएंटचा समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अवहालानुसार, भारतात आढळणाऱ्या या व्हेरिएंटचा आतापर्यंत 53 देशात प्रसार झाला आहे. भारत देशात पहिल्यांदा आढळलेला व्हेरिएंट जगात पहिल्यांदा सापडलेल्या व्हेरिएंटपेक्षा कित्येक पटीने जास्त धोकादायक असल्याचे समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...