आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीवर प्रश्नचिन्ह:पोर्तुगालमध्ये फायझरची लस घेतल्यानंतर नर्सचा दोन दिवसानंतर मृत्यू, सरकारने दिले चौकशीचे आदेश

लिस्बन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्तुगालमध्ये फायजरची लस दिल्यानंतर दोन दिवसांनी 41 वर्षीय नर्सची मृत्यू झाला. याप्रकरणी पोर्तुगालच्या आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. नर्सला लस दिली तेव्हा ती पूर्णपणे स्वस्थ होती आणि तिला कोणतेही साइड इफेक्ट देखील झाले नव्हते.

दोन मुलांची आई असलेली सोनिया अझेवेदो पोर्तुगाल, पोर्तुगालमधील इंस्टिट्युट पोर्तुझी डी ऑन्कोलॉजीया (आयपीओ) येथे सर्जिकल सहाय्यक म्हणून काम करत होती. गेल्या बुधवारी सोनियासह 538 आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली होती. 31 डिसेंबर रोजी तिने आपल्या कुटुंबीयांसह जेवण केले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ती मृतावस्थेत आढळली.

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही

सोनियाचे वडील अॅबिलियो यांचे म्हणणे आहे की, माझ्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला हे मला जाणून घ्यायचे आहे. ती एक आनंदी महिला होती. तिला कोणतेही व्यसन नव्हते.

सोनिया लसीबद्दल खुश होती

सोनियाला लस घेतल्यामुळे खूप आनंद झाला होता. सोशल मीडियावर तिने आपला प्रोफाइल फोटोही बदलला आणि फेस मास्कड सेल्फीसह लिहिले की, 'मी कोरोनाची लस घेतली आहे.'

सोनियाची मुलगी वानिया म्हणाली की, सर्वकाही अचानक घडले. आम्हाला काहीही समजू शकले नाही. रात्रीपर्यंत सर्वकाही ठीक होते आणि सकाळपर्यंत सर्वकाही बदलले. लस घेतल्यानंतर मला आईमध्ये कोणताही बदल दिसला नाही. मात्र जेथे लस दिली होती तिथे तिला वेदना होत होती.

बातम्या आणखी आहेत...