आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Photos Of Fugitive Diamond Merchant Mehul Choksi From Dominica's Prison; Red Eyes And Bruises On Hand

एक्सक्लुझिव्ह PHOTO:डोळे लाल आणि हातावर मारहाणीच्या जखमा, डोमिनिकाच्या तुरुंगातून समोर आला मेहुल चौकसीचा पहिला फोटो

रोसियू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकसीने अपहरण आणि मारहाणीचा आरोप लावला आहे

14 हजार कोटींच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चौकसीचा डोमिनिकाच्या तुरुंगातून पहिला फोटो समोर आला आहे. तुरुंगात असलेल्या चौकसीने आकाशी रंगाचा टीशर्ट घातलेला दिसत आहे. तसेच, त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. विशेष म्हणजे, चौकसीच्या डोळ्याला आणि हाताला दुखापत झालेली दिसत आहे.

डोमिनिकाच्या कॅबिनेटने मेहुल चौकसीसंबंधित प्रकरणांवर आणि तो डोमिनिकामध्ये असल्यावरही चर्चा झाली. चर्चेतून कॅबिनेटने ठरवले आहे की, चौकसीबाबत आता डोमिनिकातील न्यायालय निर्णय घेईल. चौकसीच्या वकीलाने तेथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

नागरिकत्वाबाबत डोमिनिका सरकारने अँटीगुआकडून मागवली माहिती

डोमिनिकाच्या सरकारने बुधवारी सांगितले की, नॅशनल सिक्योरिटी मिनिस्ट्रीने अँटीगुआ सरकारकडून मेहुल चौकसीचे नागरिकत्व आणि इतर काही गोष्टींबाबत माहिती मागवली आहे. चौकसी अवैधरित्या डोमिनिकामध्ये आला होता. आता तो आमच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी केली जाईल. सर्व माहिती मिळाल्यानंतर त्याला अँटीगुआमध्ये परत पाठवले जाईल.यापूर्वी, अँटीगुआ-बारबुडाचे पंतप्रधान गेस्टन ब्राउनने चौकसीला भारताकडे सोपवण्यास सांगितले होते. पण, डोमिनिकाने तपासानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

चौकसीने लावला अपहरण आणि मारहाणीचा आरोप

दोन दिवसांपूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोमेनिकामध्ये चौकसीचे वकील मार्श वेनने म्हटले की, त्याने चौकशीची तुरुंगात भेट घेतली होती. वकीलाने सांगितल्यानुसार, चौकसीने डोमिनिकामध्ये अपहरण करुन आणल्याचा आणि मारहाणीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी चौकसीचा वकील याचिका दाखल करणार आहे.

क्यूबाला पळून जाण्याच्या तयारीत होता चौकसी
चौकसी मंगळवारी(25 मे) डोमिनिकामध्ये पकडला गेला. अँटीगुआ मीडियाने आपल्यारिपोर्टमध्ये दावा केला आहे की, 62 वर्षीय चौकसी डोमिनिकामधून क्यूबामध्ये पाळून जाण्याच्या तयारीत होता, यादरम्यान CID ने त्याला पकडले. सूत्रांनी सांगितल्यानुसार, तो अँटीगुआ आणि बारबुडामधून बोटीद्वारे डोमिनिकामध्ये दाखल झाला होता.

मुंबईमधील चौकसीच्या घराबाहेर नोटिशींचा खरच
मुंबईच्या वालकेश्वरमधील गोकुल अपार्टमेंटच्या 9व्या आणि 10व्या मजल्यावर मेहुल चौकसीचे घर आहे. त्याच्या घराचा दरवाजा सरकारी नोटिशींनी भरला आहे. यात बहुतेक नोटिस CBI, ED, इनकम टॅक्स, आणि पंजाब नॅशनल बँकेसह इतर अनेक बँकांच्या आहेत. या सर्व नोटिस 2019 पासून 2021 पर्यंतच्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...