आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका हल्ल्यात थोडक्यात बचावल्या अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती:गर्दीत क्रिस्टिनांवर रोखले पिस्तूल; कोर्टातून परतत असताना घडली घटना

ब्यूनस आयर्सएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिस डी किर्चनर एका हल्ल्यात थोडक्यात बचावल्या. त्या राजधानी ब्यूनस आयर्समध्ये घराबाहेर समर्थकांना भेटत होत्या, तेव्हा ही घटना घडली. गर्दीतील एका व्यक्तीने त्यांच्यावर पिस्तूल रोखले. अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडिस यांनी सांगितले की, पिस्तुलात पाच गोळ्या भरलेल्या होत्या.

पिस्तुलातून गोळी न सुटल्याने क्रिस्टिना वाचल्या. ते म्हणाले की, लोकशाहीत हिंसेला स्थान नाही.’ क्रिस्टिना 2007 ते 2015 दरम्यान राष्ट्रपती होत्या. तेव्हा त्यांच्यावर आपल्या व्यावसायिक मित्राला रस्ते बांधकाम करारात फायदा पोहोचवल्याचा आरोप झाला होता. याच प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. हल्ल्याच्या वेळी त्या सुनावणीहून परतत होत्या.

बातम्या आणखी आहेत...