आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण! चीनमध्ये मोठा विमान अपघात:132 प्रवाशांसह विमान ताशी 563 किमी वेगाने डोंगरावर कोसळले, सर्वांचा मृत्यू, 2 मिनिटांत 30 हजार फूट खाली आले, लँडिंगला 43 मिनिटे शिल्लक असताना संपर्क तुटला

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये सोमवारी दुपारी एक मोठा विमान अपघात झाला. 132 प्रवाशांना घेऊन जाणारे चायना ईस्टर्न एअरलाईंसचे बोईंग-737 जातीचे एक विमान गुआंग्शी शहरालगतच्या डोंगर रांगांत कोसळले. विमानात 123 प्रवाशी व 9 क्रू मेम्बर्स होते. या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ज्या डोंगरावर हे विमान क्रॅश झाले, तेथील काही छायाचित्रे उजेडात आली आहेत. त्यात घटनास्थळावरुन आगीचे लोळ उठताना दिसून येत आहेत.

या विमानाची उंची अवघ्या 2 मिनिटांत 30 हजार फूटांनी कमी झाली. त्यानंतर ते ताशी 563 किमी वेगाने डोंगरावर आदळले.

वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त विमान बोईंग-737 जातीचे आहे. या जातीच्या विमानांना यापूर्वीही अनेकदा भीषण अपघात झाले आहेत.

लँडिंगला 43 मिनिटे शिल्लक असताना तुटला संपर्क

'ग्लोबल टाईम्स'च्या वृत्तानुसार, 'फ्लाईट-5735' ने सोमवारी दुपारी 1.15 च्या सुमारास कुनमिंग चांगशुई विमानतळावरुन गुआंगझोऊच्या दिशेने उड्डाण केले होते. ते 3 च्या सुमारास आपल्या इच्छित स्थळी पोहोचणे अपेक्षित होते. पण, उड्डाणानंतर अवघ्या 71 मिनिटांतच ते कोसळले. लँडिंगपूर्वी 43 मिनिटे अगोदर त्याचा ATC शी असणारा संपर्क तुटला होता.

अपघातग्रगस्त विमान मागील साडेसहा वर्षांपासून कंपनीच्या ताफ्यात होते. या अपघाताविषयी चायना ईस्टर्न एअरलाईंसचे अद्याप कोणतेही निवेदन जारी केले नाही.

  • चिनी माध्यमांनी विमान गुआंग्शीच्या वुझोऊ शहरालगत कोसळल्याचे म्हटले आहे. एका ग्रामस्थाने विमान कोसळल्यामुळे लागलेल्या आगीने आसपासच्या जंगलात वणवा भडकल्याचे सांगितले.
  • चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. नागरी उड्डयण प्रशासनाने सांगितले की, सीएएसीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करुन घटनास्थळी एक बचाव पथक पाठवल्याचे सांगितले.
  • चीनने विमान अपघात व एअरलाईंसच्या सर्वच 737-800 विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्याची घोषणा केल्यामुळे बोईंगच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांची घसरण झाली आहे.

गतवर्षीचे जगभरातील मोठे विमान अपघात

मागील वर्षभरात जगभरात 15 मोठे विमान अपघात झाले. त्यात एकूण 134 प्रवाशांचा बळी गेला. तर अनेक जण जखमी झाले. 9 जानेवारी 2021 रोजी श्रीविजय एअरच्या एका विमानाला इंडोनेशियात भीषण अपघात झाला होता. त्यात विमानातील सर्व 61 प्रवाशांना मृत्यू झाला होता. हा गत वर्षभरातील सर्वात मोठा अपघात होता.

तत्पूर्वी, 2010 मध्ये चीनच्या हेनान एअरलाईंसच्या एम्प्रेयर ई-190 विमानाला भीषण अपघात झाला होता. त्यात विमानातील 96 पैकी 44 प्रवाठी ठार झाले होते.

बातम्या आणखी आहेत...