आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Plans To Make Paris The Bicycle Capital Of Europe Were Reversed, And Tensions With Pedestrians Escalated

रस्त्यावर संकट:पॅरिसला युरोपची सायकल राजधानी करण्याची योजना उलटली, पादचाऱ्यांसोबत तंटे वाढले

पॅरिस / लिज एल्डरमॅन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राेज दहा लाख लाेकांची स्वारी सायकलवरून, वाहतुकीत अडथळे, अशांतता

स्वच्छ पर्यावरणासाठी पॅरिसला युरोपची सायकल राजधानी करण्याचा संकल्प आहे. आता पॅरिसमधील सुमारे दहा लाख लोक आपल्या सायकलवरूनच नोकरी, काॅलेज व इतरत्र जातात. परंतु सायकलची ही योजना अंगलट आल्याचे चित्र आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने सायकलस्वार रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प होण्याची समस्या वाढली. वाहतुकीवर नियंत्रण राहत नसल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर सायकलस्वार आणि पादचारी यांच्यातील तंटे रोजची डोकेदुखी ठरू लागली आहे. काही प्रकरणात रस्त्यावरच मारहाणीपर्यंत जातात. सर्वात जास्त अडचण सायकलवर डिलिव्हरी करणाऱ्यांची होत आहे. त्यातही फूड डिलिव्हरी चेनशी संबंधित व्यावसायिकांना ते त्रासदायक झाले आहे. डिलिव्हरी वेळेवर करायची असल्याने हे लोक पादचारी मार्गावर घुसतात. त्यामुळे वाद निर्माण हाेताे.

गडबडीत सायकलस्वार पादचाऱ्यांची काळजी घेत नाहीत. पॅरिसमधील रहिवासी रिवाेली म्हणाले, आजकाल तुम्ही पायी चालता तेव्हा उजव्या किंवा डाव्या अशा काेणत्याही बाजूला सायकलिस्ट येऊ शकतात. कुणीही इलेक्ट्रिक स्कूटरही घेऊन येऊ शकतो. तुमच्यावर एखाद्या व्हिडिआे गेमसारखा हल्ला हाेत असताे. तुम्ही स्वत:च संरक्षण स्वत: करायचे आहे. यंदा फ्रान्स राष्ट्रपती पदाच्या दावेदार पॅरिसच्या महापाैर अॅनी हिडाल्गाे यांनी शहरात सायकलचा जास्तीत जास्त वापराची मोहीम छेडली आहे. त्यांनी पॅरिसमध्ये ११५ किलोमीटरचा अतिरिक्त ट्रॅक देखील तयार केला आहे. त्याचबराेबर २०२२ पर्यंत पॅरिसमधील नव्या कारची मर्यादाही निश्चित केली आहे.

नेत्यांना स्वत:ची पाठ थाेपटून घ्यायचीय
२० वर्षीय सारा म्हणाली, पॅरिसला सायकलची युराेपीय राजधान करून पर्यावरण संरक्षणात स्वत:ची पाठ थाेपटून घ्यायची आहे. परंतु वास्तविक परिस्थितीकडे डाेळेझाक करत आहेत. सायकलिस्ट नियमांचे पालन करत नाहीत. झेब्रा क्राॅसिंगवरून पादचाऱ्यांना रस्ता आेलांडणे देखील जाेखमीचे ठरते.

बातम्या आणखी आहेत...