आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत मुलांची गणित आणि वाचन क्षमता सुधारण्यासाठी योजना आखली होती. मात्र,आता मुलांना इतिहासही माहित नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी जारी झालेलया राष्ट्रीय चाचणीच्या निष्कर्षात विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकी इतिहासाच्या ज्ञानात उल्लेखनीय घसरण आणि नागरिकशास्त्रात किरकोळ घसरण दिसली. प्रत्येक विषयात विद्यार्थ्यांची कामगिरी खालावली आहे.
अमेरिकेत मुलांमध्ये इतिहासाच्या ज्ञानात घसरण येण्यास एक दशक आधीपासून सुरुवात झाली होती. मात्र, महामारीदरम्यान त्यात वाढ झाली. नुकतेच ती नीचांकी पातळी आली. शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागाने राष्ट्रीय चाचणीचे आयोजन केले आहे. जे विद्यार्थी बेसिक स्टँडर्डच्या खाली आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. २०१४ मध्ये २९% आणि २०१८ मध्ये ३४% च्या तुलनेत गेल्या वर्षी अमेरिकी इतिहासात आठवी इयत्तेतील जवळपास ४०% विद्यार्थ्यांनी बेसिक पातळीपेक्षा कमी गुण प्राप्त केले.आव्हानात्मक विषयाच्या पात्रता प्रकरणात आठवी इयत्तेतील केवळ १३% विद्यार्थ्यांना कुशल मानले गेले. हा आकडा एका दशकापूर्वी १८% खाली होता. प्रश्न सोपे ते गुंतागुंतीपर्यंतचे होते. उदाहरणार्थ,डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांच्या आय हॅव ए ड्रीम भाषणाने कसे घटनेचे दोन विचार क्रांतीत रूपांतरीत झाले हे ६% विद्यार्थीच सांगू शकले.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे शिक्षण सचिव मिगुएल कार्डाेना यांनी १० वर्षांपासून सुरू असलेल्या या घसरणीसाठी रिपब्लिकन पार्टीचे धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, आता इतिहासाच्या पुस्तकांवर निर्बंध लावणे आणि शिक्षकांना हे महत्त्वाचे विषय शिकवण्यापासून रोखण्यासाठी वेळ नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल आणि हे अमेरिकेला चुकीच्या दिशेने घेऊन जाईल. यामुळे आता परीक्षेतील प्रश्नांवर नव्याने विचार होत आहे.
विद्यार्थ्यांना गांभीर्याने हे शिकवावे लागेल, गुगल करू नका, लक्षात ठेवा
अरकन्सास विद्यापीठात इतिहासाचे प्रा. क्रिस्टिन डचर म्हणाले, विद्यार्थी राज्याची राजधानी किंवा घटनेची प्रस्तावना लक्षात ठेवण्यासाठी खूप कमी वेळ देतात. यासाठी ते गुगल करतात. हे वाईट नाही, मात्र त्यांना गांभिर्याने लक्षात ठेवायला शिकवावे लागेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.