आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलासाठी वेळ देण्याची गरज:झाडांना अनेक दिवस स्पर्शही करत नसल्याने शहरी लाेकांमध्ये प्लँट ब्लाइंडनेस वाढताेय

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरी जीवनातील व्यग्र दिनचर्येमुळे लाेक अनेक दिवस काेणत्याही झाडाला साधा स्पर्शदेखील करत नाहीत. तुम्ही म्हणाल हे काय भलतंच. पण शहरी जीवनात झाडे दिसत नाहीत. म्हणूनच अशा ठिकाणची व्यक्ती झाडाबद्दल तितकीशी संवेदनशील दिसत नाही. किंबहुना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ब्रिटनच्या एक्स्टर विद्यापीठातील संशाेधनातील हा निष्कर्ष आहे. झाडांसंबंधीच्या विविध घडामाेडींपासून सर्व स्तरातील लाेक हळूहळू दूर जात आहेत. त्यालाच प्लँट ब्लाइंडनेस असे नाव देण्यात आले आहे. झाडाच्या एखाद्या फांदीला स्पर्श करून किंवा झाडाच्या पानाचे निरीक्षण करून खूप दिवस लाेटलेले असतात. हा अनेकांचा अनुभव असू शकताे. झाडे-वेलींच्या सहवासात कधीही येत नसल्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती नसलेलेही अनेक लाेक असतात. परंतु झाडांच्या थेट संपर्कात येणाऱ्या किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लाेकांना मात्र झाडांबद्दलची बरीच माहिती असते. ते झाडांना आेळखतात. ग्रामीण भागातील समुदाय याबाबतीत जास्त संपर्कात असताे. त्यांना झाडांची आवडही असते आणि अधिकची माहितीदेखील असते. कारण हा वर्ग धान्यासाठी पिकांवर अवलंबून असताे. शहरात मात्र लाेक झाडांवर कमी अवलंबून असतात. त्यामुळे ते प्लँट ब्लाइंडनेसची शिकार हाेतात. परंतु झाडांच्या सहवासात काही वेळ राहिल्यास किंवा जंगलात भटकंती करूनही प्लँट ब्लाइंडनेस दूर करता येऊ शकताे, असे ‘प्लँट्स पीपल्स प्लानेट’मध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे.

झाडांच्या तुलनेत प्राण्यांवर सहज लक्ष सामान्य व्यक्तीला जंगलाचे एक छायाचित्र दाखवले गेले. त्यात प्राणी व झाडे हाेती. मग त्यात काय दिसले? असे विचारण्यात आले. त्यावर बहुतांश लाेकांनी प्राण्यांबद्दल सांगितले. पण झाडांबद्दल कमी लाेक बाेलले.

बातम्या आणखी आहेत...