आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोध:हवामान बदल रोखण्यासाठी रोपट्यांचीही मदत, झाडांमध्ये कार्बन साठवण्याची अद्भुत क्षमता

कॅनबरा (ऑस्ट्रेलिया)16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झाडे-रोपटी ऑक्सिजन देण्याव्यतिरिक्त विषारी कार्बन डायऑक्साइड वायूला स्वत:मध्ये साठवण्याची अद्भुत क्षमता असते. संशोधक ही बाब भविष्याला जोडून पाहतात. झाडांनी कार्बन डायऑक्साइडला शोषून घेतल्यामुळे जगाची हवामान बदलासारख्या समस्येपासून सुटका होऊ शकते. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून एक संशोधन करण्यात आले. त्यात रोपट्यांमध्ये निर्णय घेण्याची अद्भुत गुप्त क्षमता दिसून आली आहे. वातावरणात कधी व किती प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सोडावे हे ठरवण्याचे काम रोपटे करतात. स्कूल ऑफ मॉलिक्युलर विज्ञानाचे प्रो. हार्वे मिलर म्हणाले, भविष्यात रोपट्यांना विशिष्ट प्रकारे विकसित केले जाऊ शकते. त्यांच्यामार्फत स्वत:च्या भोजनाची व्यवस्था, त्याचबरोबर पर्यावरणालादेखील सुरक्षित ठेवले जाऊ शकेल. झाडे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. त्या दृष्टीने त्यांची लवकर वाढ व्हायला हवी. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेनंतरदेखील ते दीर्घकाळ कार्बन डायऑक्साइडला वातावरणात सोडत नाहीत. रोपटी पाइरुवेट नावाच्या पदार्थाचे उत्पादन करतात. एक रोपटे पाइरुवेटला ऊर्जेच्या रूपाने जाळून टाकू शकतो. कार्बन डायऑक्साइड सोडू शकतो. परंतु रोपटे बायोमासमधून तयार होणारे कार्बन मोठ्या प्रमाणात साठवून ठेवू शकते. नैसर्गिक रचनेत बदल न करता संशोधक आता रोपटे विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

वातावरणातील ५० % कार्बन झाडांमध्ये साठवतात
जगभरातील झाडांनी ४०० गीगाटन साठवून ठेवली आहे. जगात असलेल्या एकूण पेट्रोलच्या उत्पन्नापैकी हे ५० टक्के जास्त प्रमाण आहे. त्याची क्षमता वाढल्यास जगाची ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...