आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Plastic Crisis At The Mount Everest: Plastic Found 100 Meters Before At An Altitude Of 8848 Meters; Most Garbage Found At Base Camp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात उंच शिखरावर प्लास्टिकचे संकट:8848 मीटर उंचीवर 100 मीटर आधी आढळले प्लास्टिक; बेस कॅम्प येथे आढळला सर्वाधिक कचरा

काठमांडू/लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शास्त्रज्ञांनुसार, गिर्यारोहकांकडून वापरल्या जाणाऱ्या कापड, तंबू आणि दोऱ्यांमध्ये फायबरचा वापर होतो

जगातील सर्वात खोल मारियाना ट्रेंचवर प्लास्टिकचा ढिगारा आढळल्यानंतर आता सर्वात उंच शिखरावरही प्लास्टिकच्या संकटाचे सावट आहे. प्लास्टिकच्या तपासणीसाठी शास्त्रज्ञांनी एव्हरेस्टवरील ११ ठिकाणचे नमुने घेतले होते. यातील सर्व ठिकाणी मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. बेस कॅम्पजवळ प्रदूषणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गिर्यारोहक येथेच सर्वात जास्त वेळ घालवत असतात. ८८४८ मीटर उंच शिखरावरून सुमारे १०० मीटर आधी मायक्रोप्लास्टिकचे तुकडे आढळले आहेत. या जागेला बाल्कनी म्हटले जाते. शास्त्रज्ञांनुसार, गिर्यारोहकांकडून वापरल्या जाणाऱ्या कापड, तंबू आणि दोऱ्यांमध्ये फायबरचा वापर होतो. २०१९ मध्ये ८८० लोकांनी एव्हरेस्ट सर केले होते.

१ लिटर पाण्यात सर्वाधिक ११९ कण

संशोधक इमोजन नॅपर सांगतात की, टाकाऊ प्लास्टिकपासून मायक्रोप्लास्टिक तयार होत असल्याने याचा वापर कमी करणे किंवा पुनर्वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. हे सिंथेटिक फायबरपासून बनवलेल्या कापडापासूनही निघते. यामुळे सुती कापडाचा जास्त वापर करणे आवश्यक आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser