आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्लास्टिक प्रदूषण आता जगातील सर्वात निर्मनुष्य, थंड क्षेत्र असलेल्या आर्क्टिकपर्यंत पाेहोचले आहे. त्यामुळे संशाेधकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पृथ्वीच्या इतर भागांप्रमाणेच आर्क्टिकमधील प्रदूषणाने कहर केला आहे. लाटा, हवा, नद्यांच्या माध्यमातून प्लास्टिक आर्क्टिकपर्यंत दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तू पाेहोचल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यात कपडे, पर्सनल केअरची उत्पादने, पॅकेजिंगसह दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचा ढिगारा या भागात जमा झाला आहे. हा कचरा येथील नैसर्गिक वातावरणाला हानी पाेहोचवत आहे. मायक्रोप्लास्टिक आता पाणी, समुद्राच्या तळाशी, दुर्गम अशा समुद्रकिनारी, नद्यांमध्ये एवढेच नव्हे तर बर्फातदेखील दिसून येते. जर्मनीतील अल्फ्रेड वेनेगर इन्स्टिट्यूटच्या अध्ययनानुसार प्लास्टिक पर्यावरणास हानी पाेहोचवू शकते. त्याचबरोबर हवामान बदलासही त्याचा फटका बसू शकतो. संशाेधन टीमचे प्रमुख लेखक डाॅ. मेलानी बर्गमॅन म्हणाले, आर्क्टिकला अगदी निर्मनुष्य अशा स्वरूपाचे क्षेत्र मानले जाते. येथील वास्तव आमच्या धारणेपेक्षा खूप वेगळे राहिले. जर्नल सायन्स ऑफ द टोटल एन्व्हार्नमेंटच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच जीवंत माणसांच्या फुफ्फुसात मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले आहे. ब्राझीलमध्ये अशा आजाराने पीडित १३ पैकी ११ रूग्ण दिसून आले. सुक्ष्म कणांत पॉलिप्रोपाइलीन व पीईटीचा समावेश आहे. त्याचा वापर पॅकेजिंगमध्ये केला जातो.
दर मिनिटाला दाेन ट्रक प्लास्टिक कचरा
प्रतिकूल तापमानाने दीर्घकाळ या क्षेत्राच्या विकासामध्ये अडथळा आणण्याचे काम केले आहे. असे असले तरी हवामान बदलातून या क्षेत्रात बदल घडू लागले आहेत. आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्यावर सहा देश वसलेले आहेत. रशिया, कॅनडा, अमेरिका, डेन्मार्क, नाॅर्वे, आइसलँडचा यात समावेश आहे. आर्क्टिकमध्ये प्रदूषण सातत्याने वाढू लागले आहे. १.९ ते २.३ काेटी टन प्लास्टिक कचरा दरवर्षी पाण्यात मिसळतो. त्याचे एकूण प्रमाण दर मिनिटाला दाेन ट्रक प्लास्टिक एवढे होते.
भारतात पाच वर्षांत दुप्पट प्लास्टिक कचरा, दरवर्षी ३५ लाख टन प्लास्टिक कचरा निघतो भारतात दरवर्षी ३५ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. गेल्या पाच वर्षांत प्रतिव्यक्ती प्लास्टिक कचरा निर्माण होण्याचे प्रमाण दुपटीवर गेले आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. कचऱ्यांचा वार्षिक वृद्धीदर २१.८ टक्के आहे. २०१५-१६ या वर्षांत देशात १५.८९ लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला होता. सिंगल युज प्लास्टिक व एलिमिनेशन आॅफ प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट यावर नॅशनल डॅशबोर्डसारख्या अनेक उपक्रमांचीही सुरुवात करण्यात आली आहे.
जगात सर्वाधिक कचरा वाढवणारा देश म्हणून अमेरिकेची आेळख झाली आहे. २०१६ मध्ये चार काेटी टन प्लास्टिक कचरा होता. हा कचरा चीनच्या कचऱ्याच्या तुलनेत माेठा आहे. युरोपीय संघातील देशांच्या कचऱ्याहून जास्त कचरा म्हणून याकडे पाहिले जाते. वर्षभरात एक अमेरिकन नागरिक १३० किलोग्रॅम प्लास्टिक कचरा तयार करतो.
सहा दशकांपूर्वी प्लास्टिकच्या उत्पादनाला सुरूवात झाली. आजचे उत्पादन ८३० काेटी टन. ९० टक्के प्लास्टिकचा फेरवापर करता येत नाही. १.३ काेटी टन प्लास्टिक कचरा दरवर्षी थेट समुद्रात मिसळतो.
प्लास्टिक कचरा वाढवणारा ब्रिटन दुसरा
देश प्रति व्यक्ती कचरा एकूण
अमेरिका 130.09 किलो 4.2 कोटी टन
ईयू-28 54.56 किलो 2.9 कोटी टन
ब्रिटन 99 किलो 64 लाख टन
चीन 15.67 किलो 2.1 कोटी टन
ब्राझील 51.78 किलो 1.01 कोटी टन
इंडोनेशिया 34.9 किलो 91 लाख टन
जर्मनी 81.16 किलो 66 लाख टन
सिंगल युज प्लास्टिक वापरात भारत ९४ वा
ऑस्ट्रेलिया 59 किलो
अमेरिका 53 किलो
दक्षिण कोरिया 44 किलो
ब्रिटन 44 किलो
जपान 37 किलो
फ्रान्स 36 किलो
स्पेन 34 किलो
जर्मनी 22 किलो
चीन 18 किलो
भारत 4 किलो
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.