आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी प्लास्टिक शील्ड पूर्णपणे प्रभावी नाही : वैज्ञानिकांचा अभ्यासात दावा

तारा पार्कर पोप2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवेत त्वरित मिसळणाऱ्या कणांचा फैलाव शील्ड रोखू शकत नाही

कोरोनापासून बचाव होण्यासाठी जगभरात प्लास्टिक शील्ड वापरले जात आहे. कॅशियरला खरेदी करणाऱ्यांपासून दूर ठेवण्यासाठी, सलून किंवा वर्गात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्लास्टिक शील्डची मदत घेतली जात आहे. प्लास्टिक शील्ड विषाणूपासून सुरक्षा देईल, असे लोकांना वाटते. पण एअरोसोल, एअरफ्लो व व्हेंटिलेशनचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते, बहुतांश वेळा हे अडथळे प्रभावी ठरत नाहीत, तर स्थिती आणखी खराब करू शकतात.

वैज्ञानिकांच्या मते, त्यामुळे लोकांना आपण सुरक्षित आहोत, असे वाटते, पण ते खोटे असते. वेगवेगळ्या अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे की, चेकआउट काउंटरच्या मागे बसलेल्या व्यक्तीला सुरक्षा देणारे शील्ड विषाणूला दुसऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवू शकते, कारण शील्डमुळे हवेचा सामान्य प्रवाह बाधित होतो. व्हर्जिनिया टेकमध्ये पर्यावरण अभियांत्रिकीच्या प्राध्यापक लिन्से मर्र यांनी सांगितले की, खोकताना किंवा शिंकताना निघालेले मोठे कण तर शील्ड रोखू शकते, पण बोलताना निघालेल्या कणांचा फैलाव रोखण्यास शील्ड सक्षम नाही. कोरोना तर अदृश्य एअरोसोल कणांपासून फैलावतो, त्यामुळे प्लास्टिक शील्डचा किती उपयोग होतो, याबाबत शंका आहे.

लीड्स विद्यापीठातील पर्यावरण इंजिनिअरिंगच्या तज्ञ कॅथरीन नोक्स यांनी सांगितले की, लहान एअरोसोल शील्डवर प्रवास करतात आणि ५ मिनिटांत खोलीतील हवेत मिसळून जातात. म्हणजे लोक बराच वेळ बोलत असले तर स्क्रीन असूनही विषाणूच्या संपर्कात ते येऊ शकतात. तसेही शील्ड ज्या पद्धतीने लावले जाते, त्यामु‌ळे खूप फायदा होण्याची शक्यता नाही.

शील्ड म्हणजे संपूर्ण सुरक्षा नव्हे, मास्क घालावा : तज्ज्ञ
कॅलिफोर्निया विद्यापीठातील अभियांत्रिकी तज्ज्ञ रिचर्ड कोर्सी म्हणाले की, क्लासरूमच्या हवेत एअरोसोल असेल तर शील्ड वाचवू शकणार नाही. कार्यालये, शाळा आणि रेस्तराँत शील्ड लावताना अभियांत्रिकी तज्ज्ञांची मदत घेतली जात नाही. ते प्रत्येक खोलीतील हवेचा प्रवाह आणि व्हेंटिलेशनबाबत सांगू शकतात. खोलीत हवेचा प्रवाह जटिल होतो. फर्निचर व्यवस्था, छताची उंची आणि शेल्फ यांसारख्या वस्तूंचा त्यावर विशेष परिणाम होतो. त्यामुळे या पारदर्शक शील्डकडे संपूर्ण सुरक्षा देणारी वस्तू या रूपात पाहिले जाऊ नये. जोखीम कमी करण्यासाठी मास्क वापरणे सुरूच ठेवावे.

बातम्या आणखी आहेत...