आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा सर्वाधिक मार सहन करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियावर कोरोना व लसीबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे लोकांचा जीव जात आहे. आमच्या येथे ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांनाच कोरोना आहे, असेही ते म्हणाले.
सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या माहितीबाबत फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मसाठी काय संदेश आहे? असे बायडेन यांना विचारण्यात आले होते. यावर ते म्हणाले, फेसबुकसारख्या कंपन्या सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार होऊ देत आहेत. हे लोकांच्या मृत्यूचे कारण होत आहे. ते लोकांचा जीव घेत आहेत. लसींबाबत चुकीची माहिती जीवघेणी असल्याचे सांगत अमेरिकेचे सर्जन जनरल विवेक मूर्ती यांनी गुरुवारी म्हटले होते की, सोशल मीडिया कंपन्यांनी हे थांबवण्यासाठी उपाय करायला हवेत. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनीही आरोप केला की, फेसबुक व इतर सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर चुकीच्या माहितीविरोधात कठोर उपाय करत नाहीयेत. यामुळेच लस असूनही लोक ती घेत नाहीत. दरम्यान, फेसबुकचे प्रवक्ते केविन मॅकलिस्टर यांनी सांगितले, अमेरिकेत ३३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हॅक्सिन टूलचा वापर करून लस कोठे आणि कशी घ्यायची याची माहिती घेतली. आम्ही कोरोनाशी संबंधित चुकीची माहिती देणाऱ्या १.८ कोटींपेक्षा जास्त पोस्ट हटवल्या आहेत.
दोन आठवड्यांपासून वाढताहेत नवे रुग्ण : अमेरिकेत कोरोना रुग्ण सतत घटत असतानाच दोन आठवड्यांपासून अचानक वाढत आहेत. सध्या देशात रोज सरासरी २६,३०० नवे रुग्ण आढळत आहेत, जे याआधीच्या सात दिवसांच्या सरासरीपेक्षा ७० टक्के जास्त आहेत. दुसरीकडे, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची सरासरीही सात दिवसांच्या तुलनेत ३६ टक्के जास्त झाली आहे.
भारत कठोर झाल्याने फेसबुकने फेक न्यूज, प्रक्षोभक वक्तव्याचे ३ कोटी कंटेंट हटवले
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व आयटी कायदेतज्ज्ञ विराग गुप्तांनी सांगितले, यंदा २६ मे रोजी लागू नव्या आयटी नियमामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या कंटेंटविरोधात कठोरता वाढली. नव्या कायद्यानंतर नुकत्याच सादर अनुपालन अहवालात फेसबुकने सुमारे ३ कोटी आणि व्हॉट्सअॅपने २० लाख आक्षेपार्ह कंटेंट हटवण्याची माहिती दिली आहे. यात दिशाभूल करणारी, दुष्प्रचार करणारी सामग्री, हेटस्पीच, गुन्हेगारीला उत्तेजन देणारी पोस्ट, फेक न्यूज, धमकावणाऱ्या संदेशांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.