आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामारीच्या काळात मोबाइल, लॅपटॉप आणि संगणकावर आपला बराच वेळ गेला. ऑनलाइन शाळांमुळे मुलांकडून हा वापर जास्त झाला. अशा स्थितीत व्हिडिओ गेम्सही मुलांच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग बनला. व्हिडिओ गेम्स आपल्यासाठी नुकसानकारक असल्याचे अनेक संशोधनांत सिद्ध झाले आहे. याचे व्यसन जडल्यास आणि आपल्या दैनंदिन कामात त्याचा अडसर ठरू लागल्यास हा एक आजार असल्याचे समजून घ्या. डब्ल्यूएचओने औपचारिक पद्धतीने गेल्या महिन्यात व्हिडिओ गेम्सच्या व्यसनास आजार मानले आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही काळ खेळल्यास व्हिडिओ गेम्स फायदेशीरही होऊ शकतो. ब्रिटिश असोसिएशनच्या बोर्ड ऑफ सायन्सच्या सदस्य डॉ.हेनरिएटा बॉडन जोन्स म्हणाल्या, २०२० मध्ये गेमिंग डिसअॉर्डरची मुले एका दिवसात १२ ते १८ तासापर्यंत व्हिडिओ गेम खेळत होते. ते शाळेत जात नव्हते. हेनरिएटा इंग्लंडच्या नॅशनल सेंटर फॉर गेमिंग डिसऑर्डरच्या संस्थापक आहेत. त्या म्हणाल्या, आमच्याकडे येणाऱ्या एक तृतीयांश मुलांचे लक्ष विचलित झाले होते. त्यांना व्हिडिओ गेमचे असे व्यसन एवढे जडले होते की, कपडे बदलणे किंवा स्नान करण्याचेही लक्षात राहत नव्हते. मात्र, गेमिंग डिसऑर्डर कमी लोकांमध्ये आढळते. मात्र, हे खूप धोकादायक आहे. असे रुग्ण खिडकी वा छतावरून उडी मारण्याची धमकी देतात. मध्यरात्री बाहेर निघतात, इंटरनेटच्या शोधात अनेक मैल पायी जातात. अशात आई-वडिलांनी रोखल्यास त्यांच्यावर हल्ला चढवला जातो. दरवाजा-खिडकी तोडून मोबाइल व लॅपटॉपचा शोध घेत राहतात. डॉ. हेनरिएटा यांच्यानुसार, निश्चित वेळेत व्हिडिओ गेम खेळल्यास एकाग्रतेचा अवधी वाढण्यास मदत मिळू शकते. स्थानिक संबंध आणि समस्या सोडवण्यास मदत करू शकते. रिकाम्या वेळेत, काम अडत नसताना गेम खेळल्यास ते फायदेशीर आहे. पालकांनी मुलांना याच्या फायद्या-तोट्याची माहिती दिली पाहिजे.
पालकांची भूमिका महत्त्वाची, मुलांचा स्क्रीन टाइम निश्चित असावा
आई-वडिलांनी मुलांच्या वयानुसार, गेम कंटेंटवर लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या मोबाइल-लॅपटॉपवर मर्यादा घातली पाहिजे. स्क्रीन टाइम निश्चित केला पाहिजे. यासोबत मुलांना वेळोवेळी ब्रेक घेण्यास सांगितले पाहिजे. निश्चित वेळेनंतर वायफाय बंद करावे. मुलांनी गृहपाठ, प्रोजेक्ट, छोटी-मोठी कामे केल्यानंतर खेळावे. आई-वडिलांनी स्वत: याची कठोर अंमलबजावणी करावी आणि मुलांकडून स्क्रीन टाइमचे पालन करून घेतले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.