आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UNGA मध्ये पाकिस्तानचा रोष:​​​​​​​इम्रान खान म्हणाले - भारताने जबरदस्तीने काश्मीरवर कब्जा केला; भारताचा पलटवार - दहशतवाद्यांना आश्रय देणार देश खोटे पसरवत आहेत

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानने UN प्लॅटफॉर्मचा वापर खोटे बोलण्यासाठी केला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला शनिवारी पहाटे संबोधित केले. दरम्यान, पाकिस्तान पंतप्रधानांनी काश्मीर आणि अफगाणिस्तानला आपल्या भाषणाचा केंद्रबिंदू ठेवला. भारताने एकतर्फी पावले उचलत काश्मीरवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोपही इम्रान खान यांनी यावेळी केला आहे.

इम्रान खान यांच्या या वक्तव्यावर भारताने ही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख हे नेहमीच भारताचे अविभाज्य अंग आहेत आणि राहतील. यामध्ये पाकिस्तानने व्यापलेल्या भागांचा समावेश आहे. पाकिस्तानने त्यांना त्वरित सोडले पाहिजे असे प्रत्युत्तर संयुक्त राष्ट्रातील भारतीय मुत्सद्दी स्नेहा दुबे यांनी दिले आहे.

पाकिस्तानने UN प्लॅटफॉर्मचा वापर खोटे बोलण्यासाठी केला
दुबे पुढे म्हणाल्या की, दहशतवाद्यांना प्रोत्साहन आणि मदत करण्याचा पाकिस्तानचा इतिहास असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांना माहित आहे. विशेष म्हणजे याचा पाकिस्तानच्या धोरणातदेखील समावेश आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा वापर नेहमीच भारताविरोधात खोटे बोलण्यासाठी आणि जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केला आहे. ही पाकिस्तानची पहिलीच वेळ नाही. दहशतवादी पाकिस्तानात मुक्तपणे फिरत असून ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने आश्रय दिला होता असे स्नेहा दुबे यांनी म्हटले आहे.

इम्रानचा इस्लामोफोबिया आणि काश्मीरचा रोष
संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना इम्रान खान यांनी भारतावर काही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्यानंतर जगभरातील उजव्या विचारसरणीने मुस्लिमांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. याचा सर्वात मोठा प्रभाव भारत देशात पाहायला मिळाला. भारतामध्ये आरएसएस आणि भाजप मुस्लिमांना लक्ष्य करत आहे. मुस्लिमांमध्ये भेदभाव केला जात आहे. भारताने एकतर्फी पावले उचलत जबरदस्तीने काश्मीरवर कब्जा केल्याचा आरोपही इम्रान खांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, मीडिया आणि इंटरनेटवर बंदी आहे. लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलली जात आहे. बहुसंख्यांकांचे अल्पसंख्यांकात रूपांतर केले जात असून जग यावर निवडक प्रतिक्रिया देते हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. सय्यद अली शाह गिलानी यांच्या कुटुंबीयांवर अन्याय करण्यात आला. यांच्या कुटुंबाला त्यांचे अंतिम संस्कार इस्लामिक पद्धतीने करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ही इम्रान खांनी विधानसभेत केली.

बातम्या आणखी आहेत...