आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे दाखल झाले. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज देखील उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर 20 हजार भारतीय लोकांना मोदी यांनी संबोधन केले. भारत ऑस्ट्रेलिया संबंध, भारतीय संस्कृती, भारताची प्रगती यासह अनेक मुद्द्यांना हात घालत मोदी यांनी संवाद साधला.
ऑस्ट्रेलियाचे PM अँथनी अल्बानीज म्हणाले- 'मोदी इज द बॉस'
मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजही उपस्थित होते. ते म्हणाले- 'मोदी इज द बॉस'. भारतीय पंतप्रधानांच्या स्वागताशी संबंधित कार्यक्रमांबाबत ते म्हणाले की, येथे पहिल्यांदाच एखाद्याचे इतके भव्य स्वागत करण्यात आले आहे. पीएम मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत. दोन्ही देश त्यांच्या लोकशाही मूल्यांच्या आधारे संबंध अधिक दृढ करतील.
PM मोदी यांच्या भाषणातील मुद्दे...
या कार्यक्रमासाठी विविध भागातून आले लोक
या कार्यक्रमासाठी लोकांना ट्रेन आणि खाजगी चार्टरने सिडनीला आणण्यात आले, ज्यांना 'मोदी एअरवेज' आणि 'मोदी एक्सप्रेस' असे नाव देण्यात आले. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी ऑलिम्पिक पार्कमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियात मोदींच्या उपस्थितीत हॅरिस पार्क परिसराचे नाव 'लिटिल इंडिया' असे ठेवण्यात येणार आहे.
PM मोदींच्या भाषणापूर्वीचे पाहा फोटो...
ऑस्ट्रेलियात मोदींच्या उपस्थितीत हॅरिस पार्क परिसराचे नाव 'लिटिल इंडिया' असे ठेवण्यात येणार आहे. याआधी सोमवारी एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांना भारत-ऑस्ट्रेलिया संबंध उच्च स्तरावर न्यायचे आहेत. यात इंडो-पॅसिफिक क्षेत्र सुधारण्यासाठी संरक्षण आणि सुरक्षा संबंधांचा समावेश असेल.
मोदी म्हणाले- ऑस्ट्रेलियासोबत सहकार्य वाढविण्यावर चर्चा होईल
PM मोदी म्हणाले- मी सहज समाधानी होणारा माणूस नाही आणि मला माहित आहे की ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीज देखील असेच आहेत. मला खात्री आहे की, जेव्हा आम्ही सिडनीमध्ये भेटू तेव्हा आम्ही आमच्या नातेसंबंधांना वेगळ्या पातळीवर कसे नेऊ शकतो, एकत्र काम कसे करू शकतो आणि सहकार्य कसे वाढवू शकतो यावर चर्चा करू. राजीव गांधी यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान दोन दिवसांच्या दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी भारतीय वेळेनुसार 22 मे रोजी दुपारी सिडनीला पोहोचले. येथे त्यांनी विमानतळाबाहेर भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतली.
पहा संबंधित छायाचित्रे...
पंतप्रधान अल्बानीज यांची भेट घेणार
मोदी 24 मे रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानीज यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील. मोदी येथे ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन हर्ले यांचीही भेट घेणार आहेत. तर 25 मे रोजी सकाळी दिल्लीला ते परतणार आहेत.
मोदींचा हा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा
पंतप्रधान मोदींचा हा दुसरा ऑस्ट्रेलिया दौरा आहे. याआधी ते 2014 मध्ये सिडनीला गेले होते. मोदींच्या सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ते QUAD बैठकीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होते. मात्र, अमेरिकेत सुरू असलेल्या कर्जाच्या समस्येमुळे जपानमध्ये जी 7 शिखर परिषदेदरम्यान बैठक झाली. असे असतानाही पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलिया दौरा रद्द केला नाही.
'पंतप्रधान मोदींसाठी गर्दीचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक'
QUAD बैठकीदरम्यान, अल्बानीज म्हणाले होते की सिडनीमध्ये ज्या सामुदायिक रिसेप्शनमध्ये पीएम मोदींचा कार्यक्रम होणार आहे, तेथे फक्त 20,000 लोकांची क्षमता आहे. अशा परिस्थितीत गर्दीचे व्यवस्थापन करणे हे त्यांच्यासमोरचे आव्हान असल्याचे अल्बानीज यांनी मोदींना सांगितले.
ही बातमी पण वाचा...
फिजी-पलाऊने मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला : पापुआ न्यू गिनीचे PM म्हणाले- भारत आमचा लीडर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पापुआ न्यू गिनी येथे आयोजित फोरम फॉर इंडिया पॅसिफिक आयलंड को-ऑपरेशन (FIPIC) बैठकीत भाग घेतला. या दरम्यान पलाऊ प्रजासत्ताक आणि फिजीने त्यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला. पलाऊने पंतप्रधानांना इबाकल पुरस्कार दिला असून फिजीने 'कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द फिजी' हा पुरस्कार दिला आहे. वाचा पूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.