आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 2 दिवसीय ऑस्ट्रेलिया भारत दौरा संपवून गुरुवारी मायदेशी परतले. तत्पूर्वी, ते तिथे असतानाच अॅमनेस्टी इंटरनॅश्नलसह इतर काही स्थानिक संघटनांनी बीबीसीची वादग्रस्त डॉक्यूमेंट्री 'India:The Modi Question' ऑस्ट्रेलियन संसदेत दाखवली. स्क्रीनिंगवेळी 'द ग्रीन्स' पक्षाचे खासदार जॉर्डन स्टील - जॉन म्हणाले की, आमचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी मोदींसोबतच्या भेटीत भारतातील मानवाधिकारांच्या मुद्यावर चर्चा केली नाही. यामुळे मी नाराज आहे.
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रातील एका वृत्तानुसार, जॉर्डन स्टील - जॉन म्हणाले की, अँथनी अल्बानीज यांनी भारतातील मानवाधिकारांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या अपयशाविषयी विरोधकांची टीका ऐकण्यासाठी तयार असले पाहिजे.
मंगळवारी 20 हजाराहून अधिक प्रवासी भारतीयांनी सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. यावेळी अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख बॉस म्हणून केला. दुसऱ्या दिवशी बुधवारी दोन्ही नेत्यांनी भारतीय ध्वजाच्या रंगात रंगलेल्या सिडनी ऑपेरा हाऊससमोर छायाचित्रे काढली.
त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाच्या संसदेत पीएम मोदींवरील बीबीसीचा एक वादग्रस्त माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. त्याला काही निवडक लोकांनीच हजेरी लावली.
डॉक्यूमेंट्रीची स्क्रीनिंग वी द डायस्पोराने अनेक मानवाधिकार संघटनांच्या मदतीने आयोजित केली होती. यात CARE, Hindus for Human Rights, अॅमनेस्टी इंटरनॅशनल, Periyar Ambedkar Thoughts Circle-Australia (PATC-A) व The Humanism Project चा समावेश आहे.
भारत सरकारने बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घातली आहे. या माहितीपटातील बाबी निष्पक्षपणे दाखवण्यात आल्या नसल्याचा आरोप सरकारने केला आहे.
पाश्चिमात्य देशांची मानवाधिकारावर दुटप्पी भूमिका
अल्बानीज यांनी भारतातील मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांबद्दल आणि प्रेस स्वातंत्र्य कमी करण्याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी, अशी मागणी डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवेळी ऑस्ट्रेलियन संसदेत करण्यात आली. खासदार स्टील जॉन म्हणाले की, पाश्चात्य देश मानवी हक्कांच्या मुद्द्यावर अनेकदा दुटप्पीपणा स्वीकारतात.
ते संसदेत म्हणाले की, अल्बानीज यांनी मोदींसोबतच्या चर्चेत मानवाधिकारांचा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे यांच्याविषयीच्या माझ्या मनाताली निराशेची भावना संतापात बदलली.
ते म्हणाले, 'आम्ही भारतासोबतच्या आपल्या संबंधांना खूप महत्त्व देतो. पण आम्हाला या संबंधांत टीकेचीही जागा हवी आहे...
'भारताशी आपली मैत्री सत्यावर आधारित असावी'
डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगला संसदेत उपस्थित असलेले ग्रीन्स पार्टीचे खासदार डेव्हिड शूब्रिज म्हणाले की, ऑस्ट्रेलियाचे भारताबरोबर वस्तुस्थितीवर आधारित संबंध असावेत.
ते म्हणाले, 'भारत - ऑस्ट्रेलियात अत्यंत मजबूत संबंध आहेत. ते असलेही पाहिजेत. परंतु या मैत्रीमध्ये सत्य असले पाहिजे. ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातील मानवी हक्कांची दयनीय अवस्था, वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अभाव, हा मुद्दा भारत सरकारसोबतच्या चर्चेत मांडावा असा आमचा आग्रह आहे.
भारतातील बीबीसी डॉक्युमेंटरीवर बंदी घातल्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, "बीबीसी डॉक्युमेंटरी भारतात दाखवता येत नसेल, तर ती येथे दाखवण्यात यावी. लोकशाहीचे हृदय असणाऱ्या ऑस्ट्रेलियात."
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.