आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी फ्रान्सला पोहोचले. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पॅरिसमध्ये भारतीय समुदायाची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींचा हा पाचवा फ्रान्स दौरा आहे. फ्रान्स युरोपियन युनियनचे अध्यक्षपद भूषवत असताना मोदी पॅरिसमध्ये आले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संरक्षण, तंत्रज्ञान, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आणि एकत्र काम करण्यावरही त्यांनी सहमती दर्शवली.
याशिवाय, पीएम मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पुन्हा विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले. फ्रान्समध्ये 2002 पासून कोणताही नेता पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडला गेला नाही, परंतु मॅक्रॉन यांनी ही परंपरा मोडली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
नॉर्डिक परिषदेत सहभाग
पॅरिसला पोहोचण्यापूर्वी पंतप्रधान मोदी डेन्मार्कमधील दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेत भाग घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, भारत आणि नॉर्डिक देश खूप काही साध्य करू शकतात आणि जगाच्या समृद्धी आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.
नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, आइसलँड आणि फिनलंड हे नॉर्डिक देश आहेत. त्यांचे पंतप्रधान परिषदेला उपस्थित होते. 2018 मध्ये पहिली नॉर्डिक-इंडिया शिखर परिषद झाली. या परिषदेत कोरोना महामारीनंतर आर्थिक सुधारणा, हवामान बदल आणि अक्षय ऊर्जा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
नॉर्डिक देशांच्या पंतप्रधानांचीही घेतली भेट
परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांच्या पंतप्रधानांशी भारतासोबतच्या संबंधांवर चर्चा केली. युक्रेन-रशिया संघर्षासह जागतिक परिस्थितीवरही चर्चा केली. बीच ब्लू इकॉनॉमी, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, सोलर अँड विंड प्रोजेक्ट्स, ग्रीन शिपिंग, फिशरीज, वॉटर मॅनेजमेंट यांसारख्या क्षेत्रातील संबंध वाढवण्याबाबत त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी चर्चा केली.
मोदींनी स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांच्याशी परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. दोन्ही देश संयुक्त कृती योजनेअंतर्गत काम करत आहेत आणि त्याला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.