आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • PM Modi Hold High Level Meeting In New Delhi Ukraine Russia War Operation Ganga Kyiv News | Marathi News

युद्धादरम्यान युक्रेनहून पोलांडला जाणार भारतीय दुतावास:आता सर्व कामकाज पोलांडहून चालणार, यापूर्वी कीवहून लीवला हलवण्यात आले होते कार्यालय

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युध्दाचा आज 18 वा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले करत अनेक शहरांवर ताबा मिळवला आहे. कीवमधील बिघडती परिस्थिती पाहता भारताने आपले युक्रेनमधील दुतावास पोलंडला हलवले आहे. बिघडलेली परिस्थिती पाहून भारताने युक्रेनची राजधानी कीवमधील आपला दुतावास तात्पुरता बंद केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पुढील सूचना मिळेपर्यंत कीवमधील दूतावास पोलंडमध्ये हलवले असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 1 मार्च रोजी कीवमधील दुतावास लीव या शहरात हलवण्यात आले होते. याठिकाणाहून आतापर्यंत काम सुरू होते. त्यानंतर अखेर लीवमधूनही दुतावास पोलांडला हवण्याचा निर्णय भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे.

गेल्या रविवारी मोदींनी बोलावली होती बैठक
युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात एक बैठक बोलावली होती. त्यात भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यात आला होता. तसेच सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली होती. यावेळी, खार्किवमध्ये मारल्या गेलेल्या भारतातील रहिवासी नवीन शेखरप्पा यांचे पार्थिव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत मोदींनी संरक्षण यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यादरम्यान पंतप्रधानांनी विचारले की, विदेशी वस्तू कोणत्या मशिनरीमध्ये वापरल्या जातात? त्याचवेळी, सर्व उपकरणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडली जावीत आणि जास्तीत जास्त तंत्रज्ञान मेक इन इंडियाचे असावे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश पंतप्रधानांनी बैठकीत दिले.

या बैठकीत युक्रेनमध्ये अडकलेल्या मायदेशी परत आणण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन गंगावर देखील चर्चा केली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, NSA अजित डोवाल आणि परराष्ट्र व्यवहार आणि अर्थमंत्र्यांचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुखही उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.

17000 पेक्षा जास्त जणांना मायदेशी आणण्यात आले
ऑपरेशन गंगाद्वारे युक्रेनमध्ये अडकलेल्या 17000 पेक्षा अधिक भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. यासोबतच बांगलादेश आणि नेपाळच्या नागरिकांना आणण्यात भारताने मदत केली आहे. सरकारने ऑपरेशन गंगाला यशस्वी करण्यासाठी आपल्या चार मंत्र्यांना युक्रेन सीमेलगतच्या देशांत पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...