आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • PM To Attend 50th Independence Day Celebrations Of Neighboring Country; Sheikh Hasina's Father Will Also Visit The Ancestral Village Of Bagbandhu

मोदी यांचा बांगलादेश दौरा:पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या दौर्‍यासाठी ढाका येथे पोहचले; भेट म्हणून देणार कोरोना लसीचे 12 लाख डोस

नवी दिल्ली/ढाका6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदी हे बांगलादेशातील मुक्तिसैनिकांनी श्रद्धांजली वाहतील

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या स्वातंत्रदिनानिमित्त होणार्‍या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी दोन दिवसाच्या दोर्‍यावर पोहचले आहे. ते शुक्रवार सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आपल्या विशेष विमानाने ढाकाकडे रवाना झाले होते. त्यानंतर त्यांचे विशेष विमान हे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ढाका येथील हजरत शहा जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.

त्यांचे स्वागत करण्यासाठी बांगलादेशाच्या प्रधानमंत्री शेख हसीना या उपस्थित होत्या. याप्रसंगी विमानतळावरच प्रधानमंत्री मोदी यांना 'गॉड ऑफ ऑनर' देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या पार्श्वभूमीवर मोदी हे सहकारी देशाच्या स्वातंत्र समारोह प्रसंगी 12 लाख कोरोना लसीचे डोस भेट म्हणून देणार आहे.

मोदी हे बांगलादेशातील मुक्तिसैनिकांनी श्रद्धांजली वाहतील
ढाका येथील विमानतळावरुन मोदी यांचा गाड्यांचा काफिला बांगलादेश येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे पोहचणार आहे. तेथे पोहचल्यानंतर ते देशाच्या स्वातंत्र्यांसाठी शहीद झालेल्या जवानांना श्रदांजली वाहतील आणि त्यांच्या स्मृतिपित्यर्थ एक रोप लावतील. त्यानंतर दोन्ही देशाचे प्रधानमंत्री मिळून बंगबंधु-बापू संग्राहलयाचे उदघाटन करतील.

काली मंदिराच्या पुजेनंतर ते प्रधानमंत्री हसीना यांच्या गावी जातील
प्रधानमंत्री मोदी हे 27 मार्च रोजी सतखिरामधील श्यामनगर येथे जाऊन ईश्वरपुरी गावातील श्री श्री जसोरेश्चरी काली मंदिराला भेट देत पुजाअर्चा करतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बांगलादेशाच्या प्रधानमंत्री हसीना यांच्या तुंगिपारा गावी जाऊन तेथील बंगबंधु मुजीबुर रहमान स्मारकाला भेट देतील आण‍ि तेथे एक रोप लावतील.

बातम्या आणखी आहेत...