आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेपाळची राजधानी काठमांडसोबत आता तेथील आणखी एक प्रमुुख शहर पोखराची भारतासोबत एअर कनेक्टिव्हिटी सुरू होत आहे. पोखरात नेपाळचे तिसरे विमानतळ सुरू झाले आहे आणि बुद्धा एअरलाइन्ससह काही एअरलाइन्स भारतासोबत विमान उड्डाणे सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यासोबत येथे पर्यटनालाही चालना मिळण्याची आशा आहे. विमानतळावरून वर्षभरात १० लाख प्रवाशांची ये-जा होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये येणारे सर्वाधिक विदेशी पर्यटक भारतातून येतात आणि थेट विमान सुरू झाल्यावर पोखरातील हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिक आपल्या व्यवसायात वृद्धी होईल,अशी आशा बाळगत आहेत. मात्र, सात सरोवरांचे शहर पोखराचे आकर्षण एवढे आहे की, काठमांडूत येणारे ६० टक्के पर्यटक पोखराला आधीपासूनच भेट देत आहेत. मात्र, थेट विमानामुळे त्यात आणखी वाढ होईल. नेपाळच्या बुद्धा एअरने याआधीच वाराणसीसाठी विमानाची घोषणा केली आहे. उत्तराखंडमार्गे उड्डाण सुरू झाल्यावर ते पोखराहून नवी दिल्ली आणि डेहराडून फ्लाइटही सुरू करेल. एअरलाइन्सचे अधिकारी दीपेंद्र कर्ण म्हणाले, भारतीय पर्यटकांची संख्या विचारात घेता उड्डाणे सुरू करत आहोत. नेपाल असोसिएशन ऑफ टुअर अँड ट्रॅव्हल एजेंट्स, नाटाच्या सरचिटणीस संध्या सिग्देल म्हणाल्या, आगामी काळात भारतातून येणाऱ्या पर्यटकांमुळे हॉटेल आणि पर्यटन सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवत आहोत. आम्ही थेट उड्डाण सुरू करण्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. हॉटेलच्या विकासावर ४६.८७ अब्ज भारतीय रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. काही महिन्यांत मोठी, छोटी ३० नवे हॉटेल तयार होत आहेत. दुसरीकडे, पोखरात ५० ते ६० हजार पर्यटक थांबवण्याची व्यवस्था आहे.
अन्नपूर्णा ट्रॅकचा गेटवे आहे पोखरा, पॅराग्लायडिंगसाठी येतात पर्यटक पाेखरा जगातील प्रसिद्ध अन्नपूर्णा ट्रॅकचा गेटवे आहे. या मार्गावर पर्यटकांना पर्वत, सरोवरे आणि आसपासचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळतात. रोमांचक खेळासाठीही याची ओळख आहे. पोखरात पॅराग्लायडिंग, अल्ट्रालाइट फ्लाइट, बोटिंग आणि राफ्टिंगचा रोमांचक खेळही पयर्टकांना आकर्षित करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.