आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमावाद:ईयूचे संयुक्त लष्कर स्थापन होणार; बेलारूस-पोलंड सीमावाद सदस्य देशांच्या बैठकीत प्रस्तावाचा मसुदा फुटल्याने माहिती जाहीर

वृत्तसंस्था । ब्रुसेल्स14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलारूस व पाेलंडदरम्यानच्या सीमावादावरून युराेपात नवे लष्करी समीकरण तयार हाेत आहे. युराेपीय संघाच्या सदस्य देशांत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत संयुक्त सैन्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. लीक झालेल्या या प्रस्तावानुसार ईयूच्या देशांनी आपल्या सुरक्षेची कवायत सुरू केली आहे.

बदलते जागतिक समीकरण व रशियाचा वाढता हस्तक्षेप पाहता लष्करी पातळीवर आत्मनिर्भर हाेण्याची वेळ आली आहे, असे युराेपीय देशांना वाटते. अफगाणिस्तानातही ईयू देशांच्या नागरिकांना सुखरूप काढण्यासाठीदेखील अशाच अडचणींना ताेंड द्यावे लागले हाेते. परंतु संयुक्त लष्करासाठी युराेपीय देशांच्या बजेटमध्ये आता वाढ केली जाणार आहे.

साेबतच रशियाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नाटाेवरील अवलंबित्वदेखील कमी हाेईल. ईयूच्या सदस्यांपैकी डेन्मार्क, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया, स्वीडन संयुक्त सैन्य स्थापनेसाठी तितकेसे उत्सुक नाहीत. याआधी गेल्या वर्षी ईयूने काेराेनाच्या मुकाबल्यासाठी स्थापन केलेल्या फंडसाठीदेखील या चार देशांनी फारसे सहकार्य केले नव्हते. संयुक्त लष्करासाठी जर्मनीचे मन वळवावे लागेल. जर्मनीत निवडणुकीनंतर अजून नव्या सरकारची स्थापना झाली नाही. नवे सरकार आल्यावरच निर्णय हाेऊ शकेल.

केव्हा : मार्च २०२२ मध्ये फ्रान्सच्या अध्यक्षतेखाली मंजुरी

मार्च २०२२ मध्ये ईयूचे अध्यक्षपद फ्रान्सकडे असेल. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्राॅन ईयूच्या संयुक्त सैन्याचे सर्वात माेठे समर्थक आहेत. त्यांनी अनेक मंचावरून याबाबत मत मांडले आहे. संयुक्त सैन्य प्रत्यक्षात आल्यानंतर नाटाेवरील अवलंबित्व संपुष्टात येईल, असे त्यांना वाटते. पाेलंड, एस्टाेनियाचाही त्यास पाठिंबा आहे.

कसे : निवडक देश सहभागी, माहितीची देवाण-घेवाण
प्रस्तावानुसार ईयूच्या सर्व २७ देशांच्या सैनिकांना संयुक्त लष्करात सामील केले जाणार नाही. निवडक देशांच्या सैनिकांचा या संयुक्त सैन्यात समावेश राहील. संयुक्त सैन्य स्थापनेसाठी ईयूतील सर्व देशांकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतरच संयुक्त सैन्य स्थापना प्रत्यक्षात येऊ शकेल.

का : अमेरिका व नाटाे नाही, आता सुरक्षेत आत्मनिर्भर
बेलारूस व पाेलंड यांच्यातील सीमावादावरून ईयूतील देश पाेलंडला आपल्या संरक्षणासाठी अमेरिका व नाटाेच्या देशांवर अवलंबून राहावे लागले. या देशांनी पाेलंडला अतिरिक्त सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे. आगामी काळात एखाद्या देशाला गरज भासल्यास संयुक्त सैन्य काम करेल, असे ईयूला वाटते.

  • रशियाच्या युराेपातील वाढत्या हस्तक्षेपामुळे ईयू सदस्य देशांचे नवे समीकरण
  • 27 सदस्यीय देशांच्या बैठकीत संयुक्त सैन्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
  • 60 हजार सैनिकांच्या संयुक्त सैन्याचा प्रस्ताव. काही दिवसांत मंजुरी शक्य
  • 05 हजार सैनिक पहिल्या टप्प्यात बेलारूसजवळ पाेलंडच्या सीमेवर तैनात हाेणार.
बातम्या आणखी आहेत...