आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Poland To Ukraine, Secret Visit Of Three President Of Three Nation To Kiev; 650 Km Journey By Rail| Marathi News

पोलंड टू युक्रेन:तीन राष्ट्रप्रमुखांचा कीव्हचा गुप्त दौरा; रेल्वेने 650 किमीचा प्रवास; फ्रान्स, जर्मनी, इटलीच्या अध्यक्षांना 500 एलिट जवानांची सुरक्षा

कीव्ह, नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन हल्ल्याचा मुकाबला करणाऱ्या युक्रेनचे धैर्य वाढावे म्हणून जगभरातील नेते कीव्हला भेट देत आहेत. गुरुवारी पहिल्यांदाच तीन दिग्गज नेते कीव्हला दाखल झाले. त्यात फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर आेल्फ शुल्ज, इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रागी कीव्ह भेटीवर आले आहेत. रशियाच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे या तीन नेत्यांना पोलंडच्या सीमेवर पेरेमयशी रेल्वेस्थानकाहून विशेष रेल्वेने कीव्हला आणण्यात आले. तीनही नेत्यांनी पेरेमयशीहून कीव्ह असा सुमारे ६५० किलोमीटर आणि आठ तासांचा प्रवास केला. विशेष म्हणजे या तीनही राष्ट्रप्रमुखांना युक्रेनच्या झेलेन्स्की सरकारने ५०० विशेष सैनिकांची सुरक्षा दिली होती. तीनही राष्ट्र प्रमुखांसोबत हा सुरक्षा ताफा प्रवासात सोबत होता. रेल्वेच्या मार्गावर लागणाऱ्या रस्ते मार्गावर युक्रेनच्या सशस्त्र दलानेही त्यांना कव्हर दिले होते. तिन्ही नेत्यांचा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता. तीनही नेत्यांनी झेलेन्स्की यांची भेट घेतली.

लक्झरी ट्रेन पूर्वी क्रिमियात धावत, आता विंडो बुलेटप्रूफ
व्हीआयपी व्हिजिट ट्रेन, रसदसाठी विशेष रस्ते मार्ग

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनला येणाऱ्या नेत्यांच्या भेटीसाठी पोलंडच्या रस्त्याचा वापर केला जात आहे. पोलंड युक्रेनच्या पश्चिमेकडील भागात आहे. येथे रशियाला अद्यापही वर्चस्व स्थापन करता आलेले नाही. लक्झरी ट्रेन २०१४ पर्यंत क्रिमियात चालत होत्या. रसद पुरवठ्यासाठी पश्चिमेकडील रोड वेचा वापर होतो.

स्टारलिंकमुळे सायबर हल्ल्यापासून संरक्षण
अॅलन मस्क यांनी स्टारलिंक नेटवर्क दिले आहे. त्यामुळे कोणत्याही व्हीआयपी भेटीची गुप्त माहिती सायबर हॅकर्सच्या निशाण्यावर येऊ शकत नाही. युक्रेनचे सैन्य व सुरक्षादल व्हीआयपी भेटीच्या दरम्यान याच नेटवर्कचा वापर करतात. त्यामुळे सर्व व्हीआयपी दौरे सुरक्षितपणे पार पडतात.

युक्रेनमध्ये आतापर्यंत ५० नेत्यांची भेट
*अँटोनियो गुटेरस, संयुक्तराष्ट्र महासचिव
*अँथनी ब्लिंकन, अमेरिकी परराष्ट्रमंत्री
*लाॅयड ऑस्टिन, अमेरिकन संरक्षणमंत्री
*नॅन्सी पॉलेसी, अमेरिकी स्पीकर
*जस्टिन ट्रुडो, कॅनडाचे पंतप्रधान
*उर्सुला लेयेन, युरोपीय युनियन प्रमुख
*बोरिस जॉन्सन, िब्रटिश पंतप्रधान

बातम्या आणखी आहेत...