आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Police Deployment In Schools After Public Riots, Children Feeling Imprisoned; Dropout In Many Schools, Decline In Grades

अमेरिका:सार्वजनिक गाेळीबारानंतर शाळांत पाेलिस तैनात, मुलांची तुरुंगात असल्याची भावना; अनेक शाळांत गळती, गुणांतही घसरण

बाल्टीमाेर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील सार्वजनिक ठिकाणी झालेल्या गाेळीबाराच्या घटनांनंतर शाळांमध्ये पाेलिस तैनात करण्यात आले आहेत. परंतु काही शाळांत मुलांमध्ये आपण तुरुंगात असल्याची भावना पाहायला मिळते. जाॅन हापकिन्स विद्यापीठातील एका संशाेधनानुसार पाेलिस व कडक सुरक्षा व्यवस्था पाहून मुलांना तुरुंगात असल्यासारखे वाटू लागले आहे. अशी मुले परीक्षेतदेखील चांगली कामगिरी करू शकत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत येणे कमी केले आहे. अनेक मुले शाळा साेडल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेत नाहीत. पुढील शिक्षण घेत नाहीत. शाळेत जास्त सुरक्षा असल्यावर मुले चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकत नाहीत. अभ्यासाची गाेडी संपू लागते. संशाेधन प्रकल्पात सहभागी ओडिस जाॅन्सन म्हणाले, मुलांना आता शाळेत जाण्याची भीती वाटू लागली आहे.

पाेलिसांची कृष्णवर्णीय मुलांवर जास्त निगराणी शाळेत पाेलिस तुलनेने कृष्णवर्णीय मुलांची जास्त निगराणी करतात. शाळेत मुलांची मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाते. तसेच अमली पदार्थविषयक तपासणीही केली जाते. या सगळ्या गाेष्टींचा मुलांवर वाईट परिणाम हाेत आहे.