आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहयुद्ध होणार:अमेरिकेत राजकीय संघर्ष वाढला; गर्भपात, वर्णभेदासारख्या मुद्द्यांवर राज्यांमध्ये वाद

राजकारणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील दोन राज्ये आणि अनेक मुद्द्यांवर दोन्हींची विचारसरणी वेगळी आहे. २५ ऑगस्टला कॅलिफोर्नियाने २०३५ पासून पेट्रोलवर चालणाऱ्या कारच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा केली. यामुळे कार उद्योगाचा चेहरामोहरा बदलेल. त्याच दिवशी टेक्सासने गर्भधारणेच्या वेळेपासून गर्भपातावर बंदी घातली. गर्भपातासाठी ९९ वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. या दोन्ही घडामोडींचा एकमेकांशी संबंध नसून त्या महत्त्वाच्या ट्रेंडची चिन्हे आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे फेडरल सरकार हळूहळू काम करत असेल, परंतु राज्ये वेगाने धोरणे बनवत आहेत. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षातील राजकारण्यांमधील संघर्ष वाढला आहे. राज्य सरकारे एकमेकांच्या निर्णयांना विरोध करतात.

राज्याचे राजकारणी राष्ट्रीय संस्कृती युद्ध लढत आहेत. वर्गात कशावर चर्चा व्हायला हवी, बंदूक विकत घेणे आणि बाळगणे किती सोपे आहे, समलिंगी तरुणांना कोणत्या वैद्यकीय सुविधा देता येतील आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना कोणते फायदे देता येतील, हे ते ठरवत आहेत. रस्ते दुरुस्ती किंवा कर धोरण सुधारणांपेक्षा असे मुद्दे अधिक डेमोक्रॅटिक, रिपब्लिकन राजकारण्यांना आकर्षित करतात. याचे कारण ५० पैकी ३७ राज्यांत एकाच पक्षाची सत्ता आहे. २३ राज्यांत राज्यपाल व विधानसभा ही दोन्ही सत्तेची सूत्रे रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहेत. १४ राज्यांत डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व आहे.

एका पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांत मनमानी निर्णय घेतले जातात. टेक्सासमधील बहुतांश लोक नवीन गर्भपात कायदा कठोर मानतात. टेक्सासमध्ये एका पक्षाची सत्ता नसती तर विधानसभेला दुसरा मार्ग काढता आला असता. अनेक राज्यांत संघर्षाचे राजकारण सुरू आहे. गर्भपात किंवा लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या समलैंगिकांना दंड करण्याचा काही राज्यांचा मानस आहे. इतर राज्ये अशांना पाठिंबा देतात. डेमोक्रॅटिक-शासित निळी राज्ये बंदूक उत्पादकांविरुद्धच्या खटल्यांना प्रोत्साहन देतात, कॅलिफोर्नियाला नवीन कार्बन उत्सर्जन मानके ठरवण्यापासून रोखण्यासाठी रिपब्लिकन-शासित लाल राज्ये खटलेबाजी करतात. टेक्सासचे रिपब्लिकन गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांनी भरलेल्या बसेस त्यांच्याबाबत डेमोक्रॅटिक राज्यांच्या मवाळ भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी न्यूयॉर्कला पाठवल्या होत्या. चिंतेची बाब म्हणजे राजकीय पक्षपात अमेरिकन लोकशाहीला धोका निर्माण करत आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन यांना पराभूत करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या धडपडीला समर्थन न देणारे अनेक रिपब्लिकन नेते पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकू शकत नाहीत. नोव्हेंबरमधील संसदेच्या मध्यावधी निवडणुकांनंतरही असे वाद वाढतील. अनेक राजकीय तज्ज्ञांचा अंदाज असला तरी अमेरिकेत आणखी एक गृहयुद्ध होणार नाही, पण राजकीय हिंसाचाराचा पाया घातला गेला आहे. पुढे परिस्थिती आणखी बिकट होईल. अमेरिकन लोकशाही कमकुवत झाल्याने जगातील धोकेही वाढतील. लोकशाही व कायद्याच्या राज्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक देश अमेरिकेवर अवलंबून आहेत.

वादामुळे व्यवसाय करणे होत आहे कठीण राज्यांत सुरू असलेले वाद फूट पाडणारे आहेत. रिपब्लिकन लाल राज्ये व डेमोक्रॅटिक निळी राज्ये मतभेदांमुळे एकत्र चालू शकत नाहीत, असा संदेश यातून जातो. यामुळे अमेरिकेत व्यवसाय करणे कठीण होत आहे. पूर्वी संपूर्ण देश ही एकसंध बाजारपेठ होती. आता कॅलिफोर्निया व न्यूयॉर्क राज्ये कंपन्यांना कार्बन उत्सर्जन घट व हरित ऊर्जेसाठी प्रोत्साहित करतात. दुसरीकडे टेक्सास आणि वेस्ट व्हर्जिनिया कंपन्यांना तेल आणि गॅसपेक्षा ऊर्जेच्या नवीन स्रोतांना प्राधान्य दिल्याबद्दल दंड करतात. अलीकडेच टेक्सासने हरित ऊर्जेला प्रोत्साहन दिल्यासाठी दहा कंपन्यांना काळ्या यादीत टाकले.

बातम्या आणखी आहेत...