आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Politics On Capital Hill Violence : US Lawmakers Coronate And Forget About Deaths And Join Trump's Discussion

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅपिटल हिल हिंसाचारावर राजकारण:अमेरिकेच्या खासदारांना कोरोना, मृत्यूचा विसर; दंगल, ट्रम्पवरच चर्चा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅपिटल हिंसेनंतर अमेरिकी खासदारांच्या सोशल मीडियावरील हालचालींचे विश्लेषण

अमेरिकी काँग्रेसच्या खासदारांनी ६ जानेवारीला कॅपिटल हिलवरील हिंसाचारानंतर सोशल मीडियावर उपस्थिती वाढवली असून पोस्टमध्ये निवडक शब्दांचा वापर सुरू केला आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे आठवडाभरात कोरोनाची १२ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आणि १५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू होऊनही खासदार निश्चिंत आहेत. ते यावर जास्त बोलत नाहीत. त्यांच्या चर्चेत कोविड किंवा कोरोना उल्लेख मार्च २०२० नंतर दुसऱ्या सर्वात खालच्या पातळीवर गेला आहे. निवडणुकीत सर्वाधिक चर्चा यावरच होती. त्याऐवजी ते ट्रम्प, अतिरेकी, दंगली, लोकशाही, बंडखोरी, आंदोलन, पोलिसांचे अपयश आणि कायद्यावरच जास्त बोलतात.

हिंसेआधी कोरोना मोठा मुद्दा, आता राजकारण मोठे

६ जानेवारीआधी अमेरिकेचे सर्व खासदार सर्वाधिक चर्चा कोरोना किंवा त्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत करायचे. मात्र, ६ जानेवारीनंतर त्यांचे लक्ष विचलित झाले आहे. कोरोनाचे रुग्ण व मृत्यू सतत वाढत आहेत. दोन्ही पक्षांचे खासदार आता कोरोनाची चिंताही करत नाहीत तसेच जास्त उल्लेखही करत नाहीत. सोशल मीडियावरील त्यांच्या चर्चेतून कोरोना हळूहळू गायब होत आहे.

रिपब्लिकनवर संतापाच्या इमोजीत १७% वाढ

खासदारांची पोस्ट आणि त्यांच्यावरील प्रतिक्रियांच्या विश्लेषणातून दिसते की, रिपब्लिकन खासदारांच्या पोस्टवर लोकांचा आक्रोश वाढत आहे. ६ जानेवारीनंतर ५ दिवसांत त्यांच्या पोस्टवर आक्रोशाच्या इमोजी १७% वाढल्या. रिपब्लिकनच्या पोस्टच्या रिटि्वट ५६% घटल्या आहेत. पसंती दर्शवणाऱ्या ६०% घटल्या. दुसरीकडे डेमोक्रॅटिक खासदारांचे रिट्वीट दुप्पट वाढले आहेत.

> कॅपिटल हिल्सवर हल्ल्यानंतर ९३% रिपब्लिकन खासदारांचे फॉलोअर्स ४-५% घटले आहेत.

> ९८% डेमोक्रॅटिक खासदारांचे फॉलोअर्स सरासरी ५% पर्यंत वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...