आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये सांस्कृतिक संवेदनशीलतेच्या नावाखाली आशियाई समाजाशी संबंधित कोणताही गुन्हेगार शिक्षेपासून वाचू शकणार नाही. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी “ग्रुमिंग गँग्ज’चा सामना करण्यासाठी सोमवारी नव्या उपायांची घोषणा केली. याअंतर्गत नवा कृती गट तयार होईल. मुले आणि युवतींच्या लैंगिक छळासाठी जबाबदार गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी या टास्क फोर्समध्ये तज्ज्ञ अधिकारीही सहभागी असतील. यासोबत त्यांनी दावा केला की, या कारवाईमध्ये राजकारण येणार नाही.
ब्रिटनमध्ये अनेक टोळ्यांचा शोध त्यांच्या मूळ वंशाच्या लोकांच्या संदर्भात घेणे भाग पडते,यामुळे त्यांना पकडले जाऊ शकत नाही. आपल्यावर वर्णभेदाचा आरोप लागू नये यासाठी पोलिस आशियाई वंशाच्या गुन्हेगारांना पकडणे टाळत होते. नव्या टास्क फोर्सची घोषणा करण्याआधी सुनक म्हणाले, त्यांच्यासाठी महिला आणि मुलींची सुरक्षा सर्वोच्च आहे. ग्रुमिंग गँग टास्क फोर्स स्थानिक दलांना मदत करेल आणि पोलिस चौकशीत मदतीसाठी जातीयतेची आकडेवारी देऊ करेल. राजकीय शुद्धतेमुळे आपल्याला मुले आणि युवा महिलांवर गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी रोखले आहे. पंतप्रधान कार्यालयानुसार, डेटा विश्लेषक गुन्हेगारांच्या ओळख निश्चितीसाठी पोलिस रेकॉर्ड, जातीची आकडेवारी आणि गुप्त माहितीचा उपयोग करून टास्क फोर्ससोबत काम करेल.
मुलींना ड्रग्ज पुरवठा, अत्याचार करतात ब्रिटिश पाकिस्तानी : सुएला ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी रविवारी सांगितले होते की, लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळ्या पुरुषांच्या आहेत. यामध्ये सर्व जवळपास ब्रिटिश पाकिस्तानी आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी राजकारण, वर्णभेद आणि कट्टर संबोधले जाण्याच्या भीतीतून या संकेतांकडे डोळेझाक केली आहे. त्यांनी सांगितले की, ब्रिटिश पाकिस्तानींची टोळी ड्रग्ज देते आणि अत्याचार करते. सरकारच्या म्हणण्यानुसार, अनिवार्य रिपोर्टिंगवर लक्ष केंद्रीत केले जाईल. बाल शोषणावर गप्प बसणाऱ्यांची जबादारी निश्चित केली जाईल. सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यावर मुले आणि तरुणींना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा संकल्प सोडला आहे.
पाकिस्तानींना त्यांच्या देशात पाठवण्याचे डील शालेय विद्यार्थिनींवर पाकिस्तानी ग्रुमिंग गँग निशाणा साधतात. याची माहिती मिळाल्यावर तपास संस्था त्यास मुस्लिम समुदायाच्या सदस्यांद्वारे इस्लामोफोबियाच्या रूपात प्रचारित करण्याच्या भीतीतून सार्वजनिक करत नाही. ब्रिटनने गेल्या वर्षी पाकशी करार केला होता. याअंतर्गत अवैध पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवले जाऊ शकते.
चिंता : ब्रिटनमध्ये गुन्हेगारी दर ८% ब्रिटनमध्ये गुन्हे वाढत आहेत. ब्रिटनच्या गुन्हेगारी अहवालानुसार, २०२२-२३ मध्ये गुन्हेगारी दर १००० लोकांमध्ये ७५.८८ आहे. सुमारे ८% आहे. वेल्समध्ये हा दर ८.३% आहे. गुन्ह्यांत सर्वात वर असामाजिक वर्तन आहे. त्यानंतर वर्णभेद आहे. ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांचे आव्हान आहे. ही प्रकरणे ३% आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.